Ten Essential Car Accessories : आपल्यातील अनेकांना ट्रेन, बसपेक्षा कारने प्रवास करणे सोईस्कर व आरामदायी वाटते. पण, उत्तम प्रवास व्हावा म्हणून गाडीच्या रचनेत काहीसा बदल करावा लागतो किंवा काही आरामदायी गोष्टीसुद्धा गाडीत बसवून घ्याव्या लागतात. तर अशा अनेक कार ॲक्सेसरीज (Car Accessories) बाजारात मिळतात; ज्यामुळे कारचा प्रवास आरामदायी आणि सोईस्कर (Comfort) होतो. तर, काही ॲक्सेसरीजमुळे कारच्या लूकमध्येसुद्धा भर पडते. या ॲक्सेसरीज कोणत्या आहेत ते चला पाहू…

कार कव्हर- धूळ, माती, पक्षी-प्राण्यांची विष्टा आदी अनेक गोष्टींमुळे कारला खराब होण्यापासून वाचविणे महत्त्वाचे असते. कारला कव्हर घातल्यामुळे तुमची कार पूर्णपणे झाकली जाऊ शकते आणि त्यामुळे तुमचे अशा प्रकारे कारचे कोणतेही नुकसान होणार नाही. नंतर कार वापरण्यापूर्वी फक्त तुम्हाला दररोज सकाळी गाडीवरचे कव्हर काढावे लागेल. पण, आपल्यातील अनेकांना कारला कव्हर घालण्याचा खूप कंटाळा येतो आणि त्यामुळे वारंवार आपली कार खराब होते.

maharashtra winter updates
स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!

क्लीनिंग कापड- बिल्डिंगखाली गाडी पार्क करताना कव्हर घालणे ठीक आहे. पण, हेच आपण ऑफिस किंवा पाहुण्यांच्या घरी गेल्यावर तिथे पार्क केलेल्या कारवर कव्हर घालू शकत नाही. अशा परिस्थितीत एक क्लीनिंग कापड ही एक प्रकारची ॲक्सेसरी (Car Accessories) आहे, जी तुमची मदत करू शकेल. कारण- पार्किंगच्या ठिकाणीही गाड्या घाण होतात. तेव्हा क्लीनिंग कापड वापरून, तुम्ही तुमच्या कारवरील घाण, धूळ इत्यादी पुसून टाकू शकता.

सीट कव्हर आणि फ्लोअर मॅट्स- आजकाल अनेक कार सीट कव्हर्स व फ्लोअर मॅट्ससह येतात; ज्यामध्ये व्हेरिएंट किंवा ॲक्सेसरीज आवश्यक म्हणून डीलर्सद्वारे ऑफर केल्या जातात. पण, बऱ्याच वेळा या ॲक्सेसरीज तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मिळत नाहीl. त्यामुळे तुम्ही त्या बाजारातून तुमच्या पसंतीने खरेदी करू शकता.

हेही वाचा…Car look: वर्षानुवर्षे गाडी नवीकोरी दिसावी असं वाटतंय? मग ‘या’ पाच टिप्सची होईल मदत

एअर फ्रेशनर- तुमची कार आतून कितीही स्वच्छ असली तरी… त्यात कुबट वास तर येत नाही आहे ना हे तपासून पाहणेही गरजेचे आहे. तुम्ही कारमधून फिरत असताना तुम्हाला छान वाटेल आणि इतरांचा प्रवासही आनंदी जाईल यासाठी गाडीमध्ये छान एअर फ्रेशनर लावून घ्या.

पंक्चर रिपेअर किट – तुमच्या कारचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे टायर्स. हे टायर्स वेळेत कार थांबण्यास आणि खराब हवामानात गाडी चालविताना सुरक्षित राहण्यास मदत करतात. त्यामुळे तुमच्या कारच्या टायर्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे पंक्चर दुरुस्ती किट तुमच्याबरोबरच ठेवणे महत्त्वाचे आहे. स्पेअर व्हीलबरोबर ठेवून, पंक्चर रिपेअर किट खरेदी करू शकता.

टायर इन्फ्लेटर आणि प्रेशर गेज – पंक्चर दुरुस्त करण्यासाठी पंक्चर रिपेअर किट आणि एअर इन्फ्लेटर या दोन गोष्टी तुमच्याकडे हव्यात. जर तुमच्या कारचा एखादाही टायर पंक्चर झाला असेल, तर तुम्ही कार कुठेही नेऊ शकत नाही. टायर इन्फ्लेटर आणि प्रेशर गेज असल्याने तुम्हाला प्रवासात तुमच्या कारचे डिफ्लेटेड टायर फुगवण्यात मदत होते; जे तुम्ही बाजारातून खरेदी करू शकता.

जीपीएस नेव्हिगेटर – एखाद्या अनोळखी ठिकाणी पहिल्यांदा जाताना किंवा रस्ता लक्षात राहत नसेल, तर GPS नेव्हिगेटर एक सोईस्कर साधन आहे. तुमच्याकडे इंटरनेट नसेल किंवा तुमचा फोन बंद झाला असेल, तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या कारमध्ये GPS नेव्हिगेटर हवा; जो प्रवासात नेहमी तुमच्याबरोबर कनेक्ट राहतो.

टूल किट – गाडी किंवा घरातील कुठलेही यंत्र बंद पडले, तर आपण घरातले ‘टूल किट’ यंत्र उघडायला, दुरुस्त करायला व बंद करायला वापरतो. ‘टूलकिट’मधले प्रत्येक अवजार किंवा टूल हे यंत्र दुरुस्त करताना वेगवेगळ्या कामासाठी वापरले जाते. उदा. स्क्रू ड्रायव्हर हा स्क्रू घट्ट करण्यासाठी, पक्कड घट्ट पकडण्यासाठी, टेस्टर करंट येतोय का हे बघायला वापरला जातो. हे टूल किट तुम्ही वेळप्रसंगी गाडी दुरुस्त करण्यासाठी वापरू शकता.

पार्किंग सेन्सर्स / कॅमेरा – पार्किंगच्या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षितपणे कार उभी करणे हे आपल्या सर्वांसाठी एक मोठे आव्हान ठरते. पार्किंग सेन्सर आणि कॅमेरे चुकीच्या गोष्टी चोरी किंवा एखाद्या गाडीने मुद्दाम तुमच्या गाडीला मारलेली टक्कर आदी गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करू शकतात. त्यासाठी तुम्ही पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरे या बाबी कारमध्ये बसवू शकतात.

नेक कुशन

ही कारमधील अत्यावश्यक ॲक्सेसरीज (Car Accessories) आहे. सीटवर बसल्यानंतर मानेच्या मागे राहिलेली जागा त्या माध्यमातून भरून निघते. त्यामुळे ड्रायव्हिंगची स्थिती चांगली राहते.

तर तुम्हाला ज्या सोईस्कर व बजेट फ्रेंडली वाटतील अशा ॲक्सेसरीज तुम्ही निवडू शकता.