Car and bike tyre: कार असो किंवा बाईक टायरची विशेष काळजी घेणे खूप आवश्यक आहे. कार किंवा बाईकचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे टायर. अशा परिस्थितीत टायर मॉनिटरिंग करणे आणि टायरचे आयुष्य वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. टायरचे आयुष्य वाढवायचे असेल तर कार किंवा बाईकस्वाराने काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारच्या टायरची जितकी चांगली काळजी घेतली जाईल तितका कारचा टायर चांगला परफॉर्म करेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या वाहनाची विशेष काळजी घेऊ शकता.
तुमच्या कारचा टायर किती काळ टिकेल हे तुमच्या टायरच्या हवेच्या दाबावर अवलंबून असते. टायरमध्ये हवा पूर्ण भरली नसेल तर त्यावर जास्त दाब येतो आणि तो लवकर खराब होतो. अशा स्थितीत गाडीचे टायर वेळोवेळी तपासा, जेणेकरून टायर झिजणार नाहीत. तसेच जर तुम्ही तुमच्या टायरमध्ये सामान्य गॅसऐवजी नायट्रोजन गॅस भरला तर टायरचे आयुष्य वाढेल. नायट्रोजन वायू सामान्य वायूपेक्षा खूप चांगला असतो. यामध्ये टायर ओलसर होण्याची शक्यता कमी असते.
टायर सीलंट वापरा
वाटेत टायर पंक्चर झाल्यास तो दुरुस्त करण्याऐवजी टायर सीलंट वापरा. असे केल्याने हवेचा दाबही कमी होत नाही. तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल तर टायर सीलंट हा नेहमीच चांगला पर्याय आहे.
ही काळजी घ्या
खराब रस्त्यावर गाडी चालवल्यामुळे गाडीच्या चाकांमध्ये चाकांचे असंतुलन किंवा अलाइनमेंटसारख्या समस्या उद्भवतात, त्यामुळे कारचे टायर लवकर झिजू लागतात आणि कारचे मायलेज कमी होऊ लागते. कार चालवताना प्रत्येक १०,००० किलोमीटर अंतरावर व्हील अलाइनमेंट करणे आवश्यक आहे.
टायरमध्ये बदल करू नका
वाहन खरेदी केल्यानंतर बरेच लोक टायर वेगळे करून त्यात बदल करून घेतात. अनेकदा असे टायर गाडीच्या मूळ टायरच्या तुलनेत आकाराने लहान किंवा मोठी असतात. असे टायर बसवल्याने वाहनाच्या मायलेज आणि इंजिनवर निश्चितच परिणाम होतो. याशिवाय ते टायरदेखील लवकर खराब होतात, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
हेही वाचा: सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या
कारचे टायर कधी बदलावे?
बाईक-कारचे टायर फक्त ४० हजार किलोमीटर टिकतात, त्यानंतर ते बदलावे. असे न केल्यास गाडी रस्त्यावर कुठेही पंक्चर होऊ शकते.