टू व्हीलर सेक्टरमध्ये मायलेज देणार्या स्कूटरची लांबलचक रेंज आहे, ज्यांची किंमत ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत आहे, जर तुम्हालाही स्कूटर घ्यायची असेल पण कमी बजेटमुळे ती खरेदी करता येत नसेल, तर Honda Activa वरची ऑफर तुमच्या मदतीची ठरणार आहे.
जर तुम्ही शोरूममधून Honda Activa खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ६९,६४५ रुपये ते ७१,३१९ रुपये मोजावे लागतील, परंतु या ऑफरमध्ये तुम्ही ती फक्त ३० हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Honda Activa वर मिळत असलेली ही ऑफर BIKES24 या सेकंड हँड टू व्हीलर विकणाऱ्या वेबसाइटने दिली आहे. ही स्कूटरवरील ऑफरची जाहिरात त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही ही स्कुटर अर्ध्या किंमतीत म्हणजेच फक्त 30 हजार रुपयात खरेदी करू शकाल.
Bikes24 वर दिलेल्या माहितीनुसार, या स्कूटरचे मॉडेल २०१५ चे आहे आणि तिने आतापर्यंत ७८,८५९ किमी अंतर कापले आहे. या Honda Activa स्कूटरची फर्स्ट ओनरशीप आहे आणि त्याची नोंदणी HR-29 RTO कार्यालय, हरियाणा येथे आहे.
आणखी वाचा : शानदार ऑफर! केवळ २१ हजारात घरी न्या Bajaj Discover 150 बाईक
कंपनी या स्कूटरच्या खरेदीवर काही अटींसह एक वर्षाची वॉरंटी योजना देत आहे, तसेच सात दिवसांच्या मनी बॅक गॅरंटी योजना सुद्धा देण्यात येत आहे. या मनी बॅक गॅरंटीनुसार, जर तुम्ही ही स्कूटर खरेदी केली आणि सात दिवसांच्या आत त्यात काही दोष आढळला किंवा तुम्हाला ती आवडली नाही तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता.
आणखी वाचा : धमाकेदार ऑफर! केवळ २ लाखांमध्ये Maruti Wagon R खरेदी करण्याची संधी
स्कूटर परत केल्यानंतर, कंपनी तुमचे पूर्ण पेमेंट तुम्हाला कोणत्याही कपातीशिवाय किंवा कोणत्याही प्रश्नाशिवाय परत करेल. ही ऑफर वाचल्यानंतर तुम्हाला ही Honda Activa खरेदी करायची असेल, तर आता या स्कूटरच्या स्पेसिफिकेशन आणि मायलेजची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Honda Activa मध्ये सिंगल सिलेंडर १०९.५१ cc इंजिन आहे जे ७.७९ PS पॉवर आणि ८.७९ Nm पीक टॉर्क जनरेट करते, जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडलेले आहे.
Honda Activa च्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक्सचे कॉम्बिनेशन दिले आहे. Honda Activa च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर ६० किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.