Honda Car: तुम्ही जर होंडा कंपनीच्या कार खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला दिग्गज वाहन उत्पादक कंपनी होंडा कार इंडियाच्या मॉडेल्सवरील जबरदस्त सूटविषयी माहिती देत आहोत. या कार प्रीमियम वैशिष्ट्ये, उच्च मायलेज आणि आकर्षक डिझाइन देतात. प्रिमियम हॅचबॅक कारच्या सध्याच्या रेंजमध्ये, आम्ही Honda Jazz बद्दल बोलत आहोत, जी स्पोर्टी डिझाइन असलेली हॅचबॅक कार आहे.
Honda Jazz किंमत
Honda Jazz ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत रु. ८.०१ लाख ते रु. १०.३२ लाख आहे. या कारच्या किंमतीमुळे, अनेक लोक ही कार खरेदी करु शकत नाही. हीच समस्या लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला या कारवरील ऑफर्सबद्दल सांगत आहोत ज्यात तुम्हाला ही कार अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळू शकते.
(हे ही वाचा: मोठ्या कुटुंबांची ६ लाखाची ‘ही’ आवडती कार १ लाखात घरी आणा, केवळ ‘इतका’ भरा EMI )
Second Hand Honda Jazz
Honda Jazz ची पहिली डील DROOM वेबसाइटवर आहे. येथे २०१३ चे मॉडेल Honda Jazz दिल्ली नोंदणीसह विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. या हॅचबॅकची किंमत २ लाख रुपये ठेवण्यात आली असून ती खरेदी करताना फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध होणार आहे.
Used Honda Jazz
कमी किमतीत वापरलेली Honda Jazz खरेदी करण्याचा आणखी एक सौदा OLX वर उपलब्ध आहे. येथे Honda Jazz चे २०१४ चे मॉडेल रु.३.१० लाख किमतीत विक्रीसाठी आहे. कारसोबत विक्रेत्याकडून कोणतेही फायनान्स प्लॅन किंवा ऑफर उपलब्ध होणार नाही.
(हे ही वाचा: नया है यह! ‘Hyundai Aura’ आता नव्या अवतारात, पाहताच क्षणी पडाल प्रेमात, पाहा किंमत अन् फीचर्स )
Honda Jazz Second Hand
Honda Jazz मॉडेलवरील तिसरी सर्वात स्वस्त डील CARTRADE वेबसाइटवर आहे. येथे Honda Jazz चे २०१५ चे मॉडेल उत्तर प्रदेशमध्ये नोंदणीसह सूचीबद्ध आहे. कारची किंमत ३.५० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार खरेदी केल्यावर ग्राहकाला फायनान्स प्लॅनही मिळेल.