आपण प्रत्येक जण फोर व्हीलर चालवतो. आपण जेव्हा फोर व्हीलर खरेदी करतो. बऱ्याच लोकांना फोर व्हीलर चालवायला खूप आवडते. मात्र आपण जेव्हा गाडी चालवतो. तेव्हा गाडीचे सर्व्हिसिंग करणे सुद्धा तितकेच आवश्यक असते. तसेच गाडी चालवत असताना सावध राहणे सुद्धा तितकेच आवश्यक असते. मात्र जर का तुम्ही गाडी चालवत असाल आणि अचानक तुमच्या गाडीचे ब्रेक फेल होऊ शकतात किंवा ब्रेक नीट काम करत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये कोणीही गाडी चालवणारा नक्कीच घाबरून जाऊ शकतो.
गाडी चालवताना गाडीचा कोणता पार्ट कधी खराब होईल सांगता येत नाही. विचार करा गाडी चालवताना ब्रेक फेल झाला तर काय होईल. अनेकदा नवीन शिकलेल्या वाहन चालकांना ब्रेक फेल होण्यासारख्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते. काही तांत्रिक अडचणीमुळे गाडीत बिघाड होतो आणि चालत्या गाडीचा ब्रेक काम करणं बंद करतो.त्यामूळेच आज गाडीचे ब्रेक फेल झाले तर काय उपाय केले जाऊ शकतात ही जाणून घेऊयात.
हेही वाचा : कार चालवायला शिकताय? मग रस्त्यावर गाडी चालवताना ‘या’ नियमांचे करा पालन, जाणून घ्या
जर का तुम्ही स्पीडमध्ये गाडी चालवत असाल तर अशावेळी सर्वात पहिल्यांदा आपले डोके शांत ठेवणे आवश्यक आहे आणि गाडीचा स्पीड कसा कमी करता येईल याचा विचार केला पाहिजे. ब्रेक फेल झाल्याचे जेव्हा लक्षात येईल तेव्हा एक्सीलरेटरवरून हळूहळू पाय काढा. तसेच गाडी हळूहळू पहिल्या गिअरमध्ये आणावी.
लाइट आणि हॉर्नचा वापर करावा
गाडीचे ब्रेक फेल झाल्यानंतर गाडीचे लाइट्स सुरू करावेत. यामुळे तुमच्या मागे पुढे असणाऱ्या गाड्यांना तुमच्या गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्याचे समजण्यास मदत होईल. तसेच एकसारखा हॉर्न वाजवावा.
ब्रेक झाल्यामुळे आपण गाडीचा स्पीड कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये असतो. मात्र कधीही या प्रयत्नांमध्ये रिव्हर्स गिअर टाकू नये. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. तसेच तुम्ही गाडीचा एसी देखील सुरु करू शकता त्यामुळे इंजिनवर प्रेशर येईल व गाडीचा स्पीड काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
हेही वाचा : Castrol इंडियाने लॉन्च केले ‘हे’ ऑटो केअर प्रॉडक्ट्स, जाणून घ्या कशाचा आहे समावेश
हँडब्रेकचा वापर करावा
जर का तुमच्या गाडीचा स्पीड नियंत्रित असेल तर तुम्ही गाडीचा हँडब्रेक ओढून गाडी थांबवण्याचा पर्यटन करू शकता. गाडीचा स्पीड अधिक असल्यास हँडब्रेकचा वापर करण्यापूर्वी तुमच्या मागे कोणती गाडी नाही ना याची खात्री केली पाहिजे. किंवा तुम्हाला आजूबाजूला वाळू किंवा मातीचा ढीग दिसला तर तुम्ही त्यावर गाडी नेऊन थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो.