Car Care: उन्हाळ्यात कडक उन्हापासून वाचण्यासाठी लोक खूप काळजी घेतात. शिवाय गरज असल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. आपल्याप्रमाणे गाड्यादेखील सूर्याच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकत नाहीत. उन्हात गाडी पार्क करणे सोयीचे वाटत असले तरीही त्यामुळे तुमच्या गाडीचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. उन्हामुळे कारच्या बाह्य आणि आतील भागाचे नुकसान होते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला कडक उन्हामुळे कारचे होणारे नुकसान टाळण्याचे मार्ग सांगणार आहोत.
उन्हात गाडी पार्क केल्यावर बाहेरून होणार नुकसान
- तीव्र सूर्यप्रकाशामुळे कारचा रंग फिकट होऊ शकतो, ज्यामुळे कारच्या पेंटमध्ये भेगा पडू शकतात आणि चमक कमी होण्याची शक्यता असते. कडक सूर्यप्रकाशाचा लाल, काळ्या आणि गडद रंगाच्या गाड्यांवर जास्त परिणाम होतो.
- सूर्यप्रकाशामुळे टायर, डॅशबोर्ड आणि खिडक्यांचे सील यांसारखे प्लास्टिक आणि रबरचे भाग कठीण, ठिसूळ होऊ शकतात.
- सूर्यप्रकाशामुळे कारची सीट, कार्पेट फिकट होऊ शकते, ज्यामुळे ते जुने आणि निस्तेज दिसू लागतात.
गाडीच्या आतून होणारे नुकसान
- उन्हात वाढलेल्या तापमानामुळे इंजिन जास्त काम करते, ज्यामुळे इंजिन ऑइल घट्ट होऊ शकते आणि इंजिनच्या भागांमध्ये घर्षण वाढू शकते.
- उष्णतेमुळे बॅटरीची क्षमता कमी होऊ शकते आणि तिचे आयुष्य कमी होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये बॅटरी पूर्णपणे खराब होऊ शकते.
- सूर्यप्रकाश कारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना, जसे की एअर कंडिशनर, रेडिओ आणि पॉवर विंडोला नुकसान पोहोचवू शकतो.
कारला कडक उन्हापासून कसे वाचवाल?
- शक्य असेल तेव्हा गाडी सावलीत पार्क करा. झाडांखाली किंवा पार्किंग गॅरेजमध्ये जागा वापरा.
- चांगल्या दर्जाचे कार कव्हर रंग, प्लास्टिक आणि रबर यांना सूर्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.
- सनशेड्स कारच्या आतील भागाचे थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
- तुमचे टायर्स नियमितपणे तपासा आणि योग्य हवेचा दाब राखा.
- गाडी थंड ठेवण्यासाठी एअर कंडिशनर वापरा. जर एअर कंडिशनर नसेल तर हवा आत येण्यासाठी खिडक्या थोड्या उघड्या ठेवा.
- उन्हाळ्यात तुमच्या गाडीची नियमित देखभाल करा.
या गोष्टी लक्षात ठेवा
- जर तुम्ही बराच वेळ गाडी पार्क करत असाल तर बॅटरी डिस्कनेक्ट करणे चांगले.
- गाडी थंड ठिकाणी पार्क करण्यापूर्वी, इंजिनला थोडा वेळ थंड होऊ द्या.
- गाडी उन्हामुळे खराब झाली आहे असे लक्षात येताच मेकॅनिकचा सल्ला घ्या.