देशाच्या सर्व भागात उन्हाळा शिगेला पोहोचला आहे. अनेक भागात दिवसाचे तापमान ४५ ते ४८ अंशांपर्यंत पोहोचू लागले आहे. अशा कडक उन्हात तुम्ही तुमच्या कारने लांब प्रवास करत असाल तर खबरदारी घेणे गरजेचे आहे. या उन्हाळ्यात कारबाबत थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला महागात पडू शकतो आणि जीवघेणाही ठरू शकतो . उच्च तापमानामुळे केवळ इंजिनच नाही तर तुमच्या कारच्या आतील आणि बाहेरील भागाचेही नुकसान होऊ शकते. अनेकांच्या गाड्या या उन्हात उभ्या असतात. इमारतीखाली पार्किंग नसेल तर रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कार पार्क करावी लागते. काही कामानिमित्त गेलात तर पुन्हा कारमध्ये येताना प्रचंड उष्णता जाणवते.त्यामुळे उन्हाळ्यात तुमच्या कारसोबतच आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या आणि उपयुक्त टीप्स सांगणार आहोत, ज्याचा वापरून तुम्ही कडक उन्हातही तुमच्या कारसह स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.
केबिन थंड ठेवा
कार चालवताना इंजिनसह सर्व पार्टचे तापमान वाढते. पण उच्च तापमानात कार जास्त काळ उन्हात ठेवली तर इंजिन आणि अनेक महत्त्वाचे भाग आधीच गरम होतात. उच्च तापमानामुळे इंजिन आणि आसपासच्या ताराही वितळतात आणि चिकटतात. त्यामुळे कारमध्ये शॉर्ट सर्किट होण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे उन्हाळ्यात कोणत्याही स्थितीत तुमची कार उन्हात उभी करू नका. घरी असो किंवा बाहेर, नेहमी सावलीत कार पार्क करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कारसाठी पार्किंगसाठी योग्य जागा नसल्यास, खिडक्या थोड्या खाली ठेवल्याने क्रॉस-व्हेंटिलेशन आणि केबिनमधून गरम हवा बाहेर काढण्यास मदत होते.
एसीमुळे लोड वाढतो
उन्हाळ्याच्या दिवसात कारचा एसी जास्तीत जास्त लोड घेतो. एयर कंडीशनिंग सिस्टम असल्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तुमच्या कारचे एसी युनिट तपासून घ्या. एसी युनिट कितीही शक्तिशाली असले तरीही, उन्हाळ्यात कारचे एअर कंडिशनर केबिन थंड होण्यास बराच वेळ लागतो.कार चालवण्यापूर्वी खिडक्या खाली घेतल्या तर चांगले आहे. कारचे आतील तापमान बाहेरील तापमानाशी जुळत असल्याचे जाणवल्यावर खिडक्या वर करा आणि एसी चालू करा.संपूर्ण इंजिन कूलिंग सिस्टम चांगल्या स्थितीत असणे महत्वाचे आहे.
सीएनजी किट तपासा
सीएनजी किट बसवलेल्या गाड्यांचीही उन्हाळ्यात काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सीएनजी किट आणि संपूर्ण वायरिंगची तपासणी करावी. वायरिंग किंवा पाईपमध्ये कुठे गळतीचा धोका असेल तर ते वेळीच दुरुस्त करता येते. जास्त तापमानासह गळती झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.
गाडीत वायफळ वस्तू ठेऊ नका
विशेषत: उन्हाळ्यात अशा वस्तू गाडीत ठेवणे टाळावे, ज्यांची फारशी गरज नसते. अनेक वेळा लोक गाडीला छोटेसे घर बनवून त्यात परफ्युम, स्प्रे इत्यादी वस्तू ठेवतात. पण उन्हाळ्यात गाडीचे तापमान जास्त असते आणि अशी कोणतीही वस्तू गाडीत ठेवल्यास आग लागण्याचा धोका वाढतो.
हेही वाचा – ‘या’ रंगाची कार घ्या आणि उन्हाळ्यातही प्रवासाची मजा घ्या…
खडकीच्या काचांना काळी फिल्म लावा
भारतात कारच्या काचांवर काळी फिल्म लावण्यासाठी नियम बनवण्यात आले आहेत. त्यानुसार तुम्ही बाजूच्या खिडक्यांच्या ७० टक्क्यांहून अधिक आणि पुढच्या आणि मागे ३० टक्क्यांहून अधिक काळी फिल्म लावू शकत नाही. तुमच्या कारच्या काचांवर काळी फिल्म लावल्याने तुमच्या कारचे आतील भाग थंड राहण्यास मदत होऊ शकते. ट्रॅफिक नियमांचे पालन करताना काचांवर काळी फिल्म करून तुम्ही तुमच्या कारला जास्त गरम होण्यापासून वाचवू शकता.