हिवाळ्यात अनेकदा वाहन पहिल्या प्रयत्नात सुरू होत नाही. अनेक प्रयत्न केल्या नंतर ते सुरू होते. इंजिन थंडे झाल्याने असे होते. या स्थितीमध्ये जर वाहनाला सुरू केले आणि त्यास चालवले तर इंजिनवर वाईट परिणाम होतो. असे होऊ नये यासाठी हिवाळ्यात वाहन सुरू करताना पुढील टीप्स फॉलो करणे फायदेशीर ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) कार सुरू करण्यापूर्वी थोडे थांबा

थंडीत कार सुरू केल्यानंतर जवळपास ३० सेकंदांनंतर इंजिनचे सर्व भाग काम करण्यासाठी सज्ज होतात. जेव्हा वाहन सुरू केले जाते तेव्हा हवा आणि इंधनाच्या मिश्रणाला पुढे ढकलण्यासाठी फ्युअल इंजेक्शनचा वापर केला जातो. हे काम पूर्ण करण्यासाठी ३० सेकंदाचा वेळ लागतो, त्यामुळे असे होते. म्हणून थंडीमध्ये वाहन सुरू केल्यानंतर त्यास लगेच चालवू नये.

(ई स्कुटरच्या विक्रीमध्ये मोठी वाढ; ‘या’ कंपनीने केला नवा विक्रम)

२) सामान्य वेगात वाहन चालवा

इंजिन गरम झाल्यानंतर लगेच वाहन स्पीडमध्ये चालवण्याऐवजी ५ ते १० मिनिटे सामान्य स्पीडमध्ये चालवणे चांगले समजले जाते. असे केल्याने तुमच्या कारचे इंजिन लवकर गरम होते.

३) हवामानानुसार इंधन निवडा

हवामानानुसार वाहनात पेट्रोल किंवा डिजल टाकल्यास इंजिन चांगले काम करते, असे मानले जाते. म्हणून थंडीत उच्च गुणवत्ता असलेल्या तेलाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. सिंथेटिक तेलांना मुळात अतिशय थंड्या तापमानात टिकून राहण्यासाठी तयार करण्यात आले आहे, तसेच त्यांचा चिकटपणा देखील चांगला आहे. सिंथेटिक तेल इंजिनला चांगली सुरक्षा देऊ शकते.

(रॉयल इन्फिल्डचे चाहते वाढले, सप्टेंबर महिन्यात ‘या’ ३ बाईक्सची सर्वाधिक विक्री)

४) फ्युअल एडिटिव्हचा वापर करा

थंडीमध्ये अधिक धुक्यांमुळे फ्युअल सिस्टिमध्ये पाणी जमा होते. यामुळे वाहनाच्या इंजिनवर वाईट परिणाम पडतो. म्हणून हिवाळ्यात पेट्रोल इंजिनला गरम ठेवण्यासाठी फ्युअल एडिटिव्ह आणि डिजल इंजिनला गरम ठेवण्यासाठी डिजल ९११ इंधनाचा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो.