Car Care Tips: लोक कारच्या बाह्य भागाची काळजी करण्यासाठी जितके लक्ष देतात, तितकेच लक्ष जर त्यांनी कारच्या आतील भागांकडे दिले, तर कारमधील अनेक समस्या सोडवता येतील. खूप कमी लोक गाडीच्या अंडरबॉडीकडे लक्ष देतात; पण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, तर गंज लागण्याचा धोका असतो. त्यामुळे धातूचे भाग खराब होऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या गाडीचे आयुष्य वाढवायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला गाडीचा आतील भाग सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

‘या’ टिप्स करा फॉलो

अंडरबॉडी कोटिंग

अंडरबॉडी कोटिंग हा एक संरक्षक थर आहे, जो तुमच्या कारच्या अंडरबॉडीला लावला जातो. या संरक्षक थरामुळे गंज, ओरखड्यांपासून गाडीचे संरक्षण होते. अंडरबॉडी कोटिंग रबर-आधारित, मेण-आधारित व इपॉक्सी-आधारित अशा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असते.

नियमित स्वच्छता

तुमच्या गाडीची अंडरबॉडी नियमितपणे स्वच्छ करा. विशेषतः पाऊस पडल्यानंतर घाण, चिखल काढून टाकण्यासाठी पाणी आणि साबणाद्वारे गाडी नीट स्वच्छ करून घ्या.

वॅक्सिंग

गाडीच्या खालच्या भागावर मेण लावल्यानेदेखील गाडीचे संरक्षण होते. वॅक्सिंगमुळे पाणी दूर होते.

काळजीपूर्वक गाडी चालवा

खड्डे आणि खडबडीत रस्त्यांवरून गाडी काळजीपूर्वक चालवा. गाडी चालविताना शक्यतो पाणी साचलेले भाग टाळा.

नियमित तपासणी करा

तुमच्या गाडीच्या अंडरबॉडीची नियमितपणे तपासणी करा. त्यामध्ये गाडीचे गंज किंवा अन्य काही बाबींमुळे नुकसान झाले आहे का ते पाहा. खराब झालेले भाग लगेच दुरुस्त करून घ्या.