कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमध्ये इंजिन ही एकच सामान्य बाब आहे. बऱ्याचदा लोक कारच्या पेंट, बॉडी आणि इतर गोष्टींकडे लक्ष देतात, परंतु कारच्या इंजिनकडे लक्ष देत नाहीत, ज्याचा थेट परिणाम कारच्या कार्यक्षमतेवर होतो.

गाडीच्या इंजिनची योग्य काळजी न घेतल्याने व्यक्तीला अनेकदा मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागतात. तुम्हालाही तुमच्या कारचे इंजिन परफेक्ट ठेवायचे असेल, तर तुमच्या कारचे इंजिन नेहमी चांगले ठेवणाऱ्या टिप्स आणि ट्रिक्सची संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळेल.

tujhyat jeev rangala fame actor amol naik bought a new car
रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
Aai kuthe kay karte fame Rupali bhosale bought a new car
Video: ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने दिवाळीच्या मुहूर्तावर घेतली नवी आलिशान गाडी, पाहा व्हिडीओ
without helmet officers and employees should be banned from pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : हेल्मेट नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत मज्जाव
Car sales around Diwali has fallen so low this year
Car Sales In Festive Season Low : सणासुदीच्या हंगामात ग्राहकांनी गाड्यांकडे फिरवली पाठ; विक्री झाली १८ टक्क्यांनी कमी, नेमकं कारण काय?
250 kg of firecrackers seized in action against firecrackers sellers without license
रस्ते, पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई, २५० किलो फटाके जप्त
Make malpuwa at home
घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा मालपुवा; वाचा साहित्य आणि कृती

आणखी वाचा : ११ GB RAM, ५००० mAh बॅटरीवाला फोन फक्त आठ हजारांमध्ये; जाणून घ्या या स्वस्तात मस्त फोनबद्दल

Car Service: तुमच्या क्षेत्रातील स्थानिक मेकॅनिककडून तुमची कार सर्व्हिस करून घ्यायची सवय असेल तर ती लवकर बदला. कारण स्थानिक मेकॅनिक अनेकदा कार सर्व्हिस योग्य पद्धतीने करत नाहीत. त्यामुळे कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून नेहमी तुमच्या कारची सर्व्हिसिंग करून घ्या जेणेकरून तुमच्या कारचे इंजिनची चांगली सर्व्हिसिंग होईल आणि तुमचे इंजिन चांगल्या स्थितीत राहील.

Engine Oil: इंजिन ऑइल हा कार इंजिनच्या सर्वात महत्वाच्या भागांपैकी एक आहे. जे इंजिनच्या कार्यक्षमतेसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. म्हणूनच सर्व्हिस घेताना एखाद्याने नेहमी चांगल्या ब्रँडचे इंजिन तेल घालावे. कारण स्वस्त किंवा स्थानिक इंजिन तेलामुळे तुमच्या इंजिनमध्ये उष्णता आणि सिझल सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

आणखी वाचा : धमाकेदार ऑफर! केवळ ७० हजारांमध्ये मिळतेय Maruti Alto, जाणून घ्या सविस्तर

Radiator and Coolant: रेडिएटर आणि कूलंट हे इंजिनचे खूप महत्वाचे भाग आहेत, ज्याकडे लोक सहसा थोडे लक्ष देतात. जर तुम्हाला तुमच्या कारचे इंजिन परिपूर्ण ठेवायचे असेल, तर रेडिएटरमध्ये पाण्याची पातळी नेहमी योग्य ठेवा आणि कूलंटचे प्रमाणही योग्य ठेवा जेणेकरून इंजिनमध्ये उष्णतेसारखी समस्या उद्भवणार नाही.

Clutch And Brake: कारच्या इंजिनच्या चांगल्या स्थितीसाठी तुमचे ड्रायव्हिंग देखील मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. अनेकदा लोक गाडी चालवताना विनाकारण क्लच आणि ब्रेकचा वापर करतात, ज्यामुळे इंजिनवर दबाव येतो आणि इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे गाडी चालवताना त्याचा हुशारीने वापर केल्यास इंजिनचे आरोग्य चांगले राहते.