Hyundai Smart Care Clinic Customer Connect Program: Hyundai Motor ने भारतात २५ वर्षे पूर्ण केली आहेत. अशात कंपनीने १० दिवसांचा देशव्यापी Hyundai Smart Care Clinic Customer Connect Program सुरू केला आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून, कंपनी ग्राहकांना पीरियोडिक मेंटेनेंस, सॅनिटाइजेशन, रोड साइड असिस्टंट (आरएसए) सह स्पेशल ईअर एंड ऑफर्स आणि बरेच बेनेफिट्स देत आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून कंपनीला ग्राहकांमध्ये नियमित सेवेबाबत जागरूकता वाढवायची आहे.
आणखी वाचा : Maruti Celerio: नवीन Celerio चं बुकिंग १५,००० च्या पुढे, प्रतीक्षा कालावधी वाढला, देते 26 Kmpl मायलेज
लाभ कसा घ्यावा?
जर तुम्ही Hyundai चे ग्राहक असाल आणि त्यांची कार वापरत असाल, तर तुम्ही प्रोग्राम अंतर्गत लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या वर्कशॉपमध्ये २० डिसेंबरपर्यंत जाऊ शकता. कंपनीचा हा कार्यक्रम ११ डिसेंबरपासून सुरू आहे. कंपनीने आपला कालावधी ११ डिसेंबर ते २० डिसेंबर असा ठेवला आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या वर्कशॉपला भेट देऊ शकता आणि सांगू शकता की तुम्हाला Hyundai Smart Care Clinic Customer Connect Programme द्वारे सेवांचा लाभ घ्यायचा आहे.
आणखी वाचा : कन्फर्म ! भारतात ‘या’ तारखेला लॉंच होणार Mini ची पहिली इलेक्ट्रिक कार Cooper SE, जाणून घ्या फिचर्स
तुम्हाला कोणते फायदे मिळतील?
Hyundai Smart Care Clinic Customer Connect Program मध्ये, कंपनी ग्राहकांना मॅकेनिकल पार्ट्सवर १०% सूट, मॅकेनिकल लेबरवर २०% सूट, सॅनिटायझेशनवर २०% सूट देत आहे. याशिवाय कंपनी एक वर्षाचा रोडसाइड असिस्टंट देखील देत आहे. इतकंच नाही तर १००० भाग्यवान ग्राहकांना पुढील सेवेवर मोफत इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर देखील मिळेल, म्हणजे जवळपास मोफत सेवा. कारण या दोन गोष्टींची सेवेसाठी जास्त खर्च होत आहे.
कंपनीची सेवा
कंपनी ऑनलाइन सर्व्हिस बुकिंग, वाहन स्टेटस अपडेट, पिक अँड ड्रॉप, ऑनलाइन पेमेंट सुविधेसह डिजिटल आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट पर्याय देखील ऑफर करत आहे. Hyundai चे देशात १३६० वर्कशॉपचे नेटवर्क आहे.