How to Increase Car Mileage: पेट्रोल आणि डिझेलच्या भारतातल्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत. परिणामी वाहनधारकांचा इंधनावरील खर्च वाढला आहे. त्यामुळेच अनेक कारधारक त्यांच्या कारचं मायलेज वाढवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. तर काही जण कारमध्ये सीएनजी किट बसवून घेत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी ही चिंता आणखी वाढवली आहे. ग्राहक बर्‍याचदा अशा कारच्या शोधात असतात, जी उत्तम फिचर्ससह चांगले मायलेज देते. अनेक कार निर्मात्या कंपन्या मायलेजच्या दाव्यांसाठी एआरआयच्या संख्येचा दाखला देत असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला कार चांगलं मायलेज कसं देईल यासाठी काही टिप्स देणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारचे मायलेज वाढविण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

योग्य वेगाने कार चालवा

तुमच्या कारचा वेग थेट त्याच्या मायलेजवर परिणाम करतो. जेव्हा तुम्ही कार चालवता तेव्हा गाडीला टॉप गिअरमध्ये ८० किमी प्रतितास या वेगाने ठेवा. वेग जितका जास्त असेल तितकाच इंधनाचा वापर जास्त होईल. तुम्हाला योग्य गतीने योग्य गीअर वापरावे लागेल. उच्च गीअरमध्ये कमी वेग आणि कमी गिअरमध्ये उच्च गती टाळा. असे केल्याने इंजिनवरील दाब कमी होतो.

(हे ही वाचा : Kawasaki चे धाबे दणाणले, देशात दोन दिवसात दाखल होणार नवी स्पोर्ट्स बाईक, फीचर्स पाहून व्हाल थक्क )

वारंवार ब्रेक लावणे टाळा

तुम्ही वारंवार ब्रेक लावू नये. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमचे वाहन तुमच्या समोरील वाहनापासून पुरेशा अंतरावर ठेवू शकता. तसेच, स्पीड ब्रेकर्स आणि इतर अडथळे पाहून तुम्ही वेग नियंत्रित करू शकता.

एसीचा वापर कमी करा

एसीच्या वापरामुळे कारचा मायलेज ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. एअर कंडिशनिंगमुळे वाहनाचा इंधनाचा वापर वाढतो. त्यामुळे एसीचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही खिडक्या उघडून थंड हवा वापरू शकता किंवा सतत चालवण्याऐवजी ब्रेक घेऊन एसी वापरू शकता.

(हे ही वाचा : चांगलं मायलेज अन् कमी किमतीतील टू व्हीलर शोधताय? ‘या’ बाईक्सवर होणार पेट्रोलचा एक-एक पैसा वसूल, ६५ किमीपर्यंतचं मायलेज )

योग्य टायर प्रेशर ठेवा

योग्य टायर प्रेशर नसल्यास, तुमच्या कारचे मायलेज खराब होऊ शकते. त्यामुळे, नियमितपणे तुमच्या कारच्या टायरचा दाब तपासा आणि टायरचे डेफलेक्शन योग्य मापनात ठेवा.

क्रूझ कंट्रोल वापरा

तुम्ही तुमच्या कारचे मायलेज आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी क्रूझ कंट्रोल फीचर वापरू शकता. हे वैशिष्‍ट्य तुमच्‍या कारला सेट स्‍पीडने चालू ठेवते, ज्यामुळे तुम्‍हाला ते मोकळे रस्ते आणि हायवेवर वापरता येते. क्रूझ कंट्रोल वापरल्याने तुमच्या कारचे मायलेज वाढेल, कारण त्यामुळे इंजिन चांगले चालते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car mileage easy ways to increase the mileage of your car how to increase car mileage pdb