Car Mileage Tips: तुम्हीदेखील कारचालक असाल किंवा भविष्यात कार घेण्याचा विचार करीत असाल, तर त्यापूर्वी कारची काळजी कशी घ्यावी, तसेच तुमच्या कारचे मायलेज कसे वाढवावे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ना? पण, आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारचे मायलेज वाढवू शकता.
कारचे मायलेज वाढविण्यासाठी खास टिप्स (Car Mileage Tips)
नेहमी कारच्या कंपनीचेच टायर वापरा
जेव्हा जेव्हा कारचा टायर खराब होतो तेव्हा केवळ कार ज्या कंपनीची आहे, त्याच कंपनीचे टायर लावावेत. कारण- इतर टायर कधी कधी कारच्या टायरच्या आकारापेक्षा जास्त असतातआणि त्याचा थेट परिणाम कारच्या मायलेजवर होतो.
रेल
बहुतेक गाड्यांवर रूफ रेल उपलब्ध असते; ज्यावरून लोक आपले सर्व सामान घेऊन जातात. ते पाहून काही लोक त्यांच्या छोट्या कारवरही रूफ रेल लावून घेतात; पण त्यामुळे कारच्या मायलेजवर परिणाम होतो.
गाडीत वजनदार वस्तू ठेवू नका
तुमच्या कारमधून अनावश्यक वा जड वस्तू काढून टाका. कारण- जास्त वजनामुळे इंधन कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
टायरचा दाब नियमित ठेवा
प्रत्येक वाहनचालकाची पहिली जबाबदारी ही असते की, आपल्या गाडीच्या टायरमधील हवेचा दाब तपासत राहणे. गाडीच्या मालकाने गाडीच्या टायरमधील दाब योग्य प्रमाणात कायम ठेवला, तर त्याची गाडी चांगला मायलेज देते.
कारचा वेग नियंत्रणात ठेवा
जर तुम्हालाही तुमच्या कारने चांगला मायलेज द्यावा, असे वाटत असेल, तर तुमची कार अधिक वेगाने चालविण्याचा प्रयत्न करू नका. कारण- जास्त वेगाने कार चालवल्याने मायलेज कमी होते.
हेही वाचा: डोंगराळ भागात कार चालविताना अचानक ब्रेक फेल का होतात? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
रहदारीचे क्षेत्र टाळा
दूरच्या प्रवासासाठी जात असाल, तर घरातून निघण्यापूर्वी एकदा गूगल मॅप पाहून घ्या. त्यामुले तुम्ही रहदारीच्या मार्गाने जाणे टाळू शकता. ट्रॅफिकमध्ये गाडीचे मायलेज कमी होऊ लागते. कारण- त्यावेळी क्लचचा वापर जास्त केला जातो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणाहून गाडी चालवणे टाळावे.