मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी जिमनीचे स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केले आहे. ‘जिमनी थंडर एडिशन’ असे या नवीन मॉडेलचे नाव आहे. लोकांना जिमनीकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीने आपले थंडर एडिशन लाँच केले आहे. हे मॉडेल झेटा आणि अल्फा या दोन्ही प्रकारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध असेल. जर तुम्ही मारुती सुझुकीचे जिमनी थंडर एडिशन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिमनी थंडर एडिशनची किंमत जिमनी झेटापेक्षा दोन लाख रुपये कमी आहे. मारुती सुझुकी नेक्साच्या वेबसाइटनुसार, १२.७४ लाख रुपयांची जिमनी थंडर एडिशन १०.७४ लाख रुपयांना (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे. मर्यादित कालावधीसाठी ही सुरुवातीची किंमत ग्राहकांसाठी ठेवण्यात आली आहे. तसेच जिमनी थंडर या मॉडेलच्या बदलांबाबत मारुती सुझुकी इंडियाकडून कोणताही अधिकृत संवाद नाही.

पण, जिमनीच्या या स्पेशल थंडर एडिशनमध्ये काही खास ॲक्सेसरीजदेखील उपलब्ध असणार आहेत. मारुती सुझुकी जिमनी थंडर एडिशनमध्ये के१५बी (K15B) १.५ (1.5) लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे १०५ पीएस (105PS) कमाल पॉवर आणि १३४ एनएम (134Nm) पीक टॉर्क देते. यात ५ स्पीड एमटी (5-speed MT) आणि ४ स्पीड एटी ( 4-speed AT ) दोन्ही पर्याय आहेत. जिमनी Ladder फ्रेम चेसिसवर आधारित आहे. यात ऑलग्रीप प्रो ४डब्ल्यूडी टेक्नॉलॉजीबरोबर रेंज ट्रान्सफॉर्म गिअर ४एल (4L mode) मोड स्टॅंडर्ड आहे.

हेही वाचा…‘या’ कंपनीची कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरुम्सवर तुफान गर्दी; ३० दिवसात विकल्या १.६४ लाख कार्स

लुक आणि फिचर्स :

मारुती सुझुकी जिमनी थंडर एडिशनच्या लुक आणि फिचर्समध्ये बाहेर रियर व्ह्यू मिरर्स, बोनेट आणि साइड फेंडरवर विशेष गार्निश दिसत आहे. यात साइड डोअर क्लेडिंग, फ्रंट स्किड प्लेट, डोअर सिल गार्ड आणि विशेष ग्राफिक्स आहेत.

जिमनीमध्ये झेटा आणि अल्फा हे दोन व्हेरियंट आहेत. खाली त्यांच्या किमती (एक्स-शोरूम) प्रमाणे आहेत :

झेटा एमटी – नियमित किंमत १२.७४ लाख रुपये तर मर्यादित कालावधीसाठी १०.७४ लाख रुपये किंमत करण्यात आली आहे .
झेटा एटी – नियमित किंमत १३.९४ लाख तर मर्यादित कालावधीसाठी ११.९४ लाख रुपये.
अल्फा एमटी – नियमित किंमत १३.६९ लाख रुपये तर मर्यादित कालावधीसाठी १२.६९ लाख रुपये
अल्फा एटी – नियमित किंमत १४.८९ लाख रुपये तर मर्यादित कालावधीसाठी १३.९८ लाख रुपये
अल्फा एमटी (ड्युअल टोन) – नियमित किंमत १३.८५ लाख रुपये तर मर्यादित कालावधीसाठी १२.८५ लाख रुपये
अल्फा एटी (ड्युअल टोन) – नियमित किंमत १५.०५ लाख रुपये तर मर्यादित कालावधीसाठी १४.०५ लाख रुपये


मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car news maruti suzuki launched jimny thunder edition prices slashed for customers rupees 2 lakh asp
Show comments