भारतामध्ये गेल्या काही वर्षांत कार विक्रीत मोठी वाढ झाली आहे. जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ येते, तेव्हा बहुतेक लोक कमी बजेटमध्ये चांगलं मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असतात आणि यात मारुती सुझुकीच्या कार कधीच मागे पडल्या नाहीत. सर्वांनाच माहीत आहे की, मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून दरवर्षी सर्वाधिक गाड्यांची विक्री करते. परवडणारी किंमत, मायलेज, फीचर्स, लुक डिझाईन यामुळे मारुती सुझुकीच्या कार्सना भारतीय बाजारात मोठी मागणी पाहायला मिळते.
मारुतीची वॅगन आर हॅचबॅक ही कंपनीच्या लाइनअपमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. दर महिन्याला या कारची विक्री दणक्यात असते. मारुतीची ही कार नेहमी विक्रीच्या बाबतीत टाॅपवर असते. लोकांना या कारचे पेट्रोल आणि CNG दोन्ही व्हर्जन खूप आवडतात. जर आपण मागील महिन्याबद्दल बोललो तर कंपनीने एप्रिल २०२४ मध्ये १७ हजार ८५० युनिट्स विकल्या आहेत.
वॅगन आरच्या एवढ्या मोठ्या मागणीमुळे कंपनीवर या कारचा पुरवठा करण्याचा सर्वात मोठा भार आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, कंपनीकडे वॅगन आर च्या सीएनजी आवृत्तीच्या ११,००० युनिट्सची ऑर्डर प्रलंबित आहे.
(हे ही वाचा : हिरोच्या बाईक सोडून आता पहिल्यादांच ‘या’ कंपनीच्या बाईक स्कूटर्सच्या मागे लागले भारतीय, झाली दणक्यात विक्री)
एका अहवालानुसार, मारुतीकडे सध्या २.२ लाख युनिट्सचा ऑर्डर बॅकलॉग आहे, त्यापैकी १.१ लाख युनिट्स सीएनजीवर चालणारी वाहने आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे Ertiga ज्याचे ६०,००० युनिट्स प्रलंबित आहेत. या MPV ची प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी कार निर्मात्याने अलीकडेच त्यांच्या मानेसर प्लांटमधील उत्पादन क्षमता एक लाख युनिट्सने वाढवली आहे.
मारुती सुझुकी WagonR मध्ये काय आहे खास?
मारुती सुझुकीने ही WagonR चार ट्रिममध्ये लॉंच केली आहे ज्यात पहिला LXi (बेस मॉडेल), दुसरा VXi, तिसरा ZXi आणि चौथा व्हेरिएंट ZXi Plus समाविष्ट आहे. कंपनी तिच्या पहिल्या दोन व्हेरिएंटसह CNG किटचा पर्याय देखील देते.
वॅगन आर सीएनजी मारुतीच्या १.०-लिटर के-सीरीज पेट्रोल इंजिनसह येते जे सीएनजी मोडमध्ये ५६bhp पॉवर आणि ८२Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजी आवृत्तीमध्ये ही कार केवळ ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. त्याच्या पेट्रोल टाकीची क्षमता २८ लीटर आहे, तर CNG टाकीची क्षमता ६० लीटर आहे. वॅगन आर सीएनजीमध्ये प्रति लीटर ३४.०५ किमी मायलेज असल्याचा कंपनीचा दावा आहे.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल, ४ स्पीकर म्युझिक सिस्टम यांसारखे फीचर्स देण्यात आली आहेत. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल, ४ स्पीकर म्युझिक सिस्टम यांसारखे फीचर्स देण्यात आली आहेत.