गेल्या काही काळापासून कार्सची चांगली विक्री होत आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग चांगली कामगिरी करत आहे. अनेक नवीन गाड्या बाजारात आल्या आहेत. यावर्षीही आतापर्यंत अनेक गाड्या लाँच झाल्या आहेत. बहुतांश कार कंपन्यांच्या विक्रीतही तेजी दिसून येत आहे. कार विक्रीत जोरदार वाढ झाली आहे. मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, ह्युंदाई कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत मोठी वाढ झालेली दिसून आली. परंतु काही कंपन्याच्या कार अशाही आहेत, ज्यांच्या कारकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे.
गेल्या महिन्यात केवळ १५५ Citroen C3 विकल्या गेल्या, तर गेल्या वर्षीच्या मे महिन्यात ६०० Citroen C3 विकल्या गेल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी कंपनीच्या विक्रीत ४४५ गाड्यांची घट झाली आहे. यंदा एकूण विक्रीत ७४ टक्क्यांनी घट झाली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीच्या २५१ गाड्या विकल्या गेल्या.
क्रॅश चाचणीत अयशस्वी
NCAP क्रॅश चाचणीमध्ये Citroen C3 ला ०-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. ब्राझिलियन-निर्मित Citroen C3 ही कंपनीची एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार आहे. माहितीनुसार, कारचे ब्राझील-स्पेक मॉडेल जवळजवळ भारत-स्पेक सी3 सारखेच आहे आणि दोन्ही एकाच प्लॅटफॉर्मवर बनवलेले आहेत. Citroen C3 ला प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १२.२१ गुण, लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ५.९३ गुण आणि क्रॅश चाचणीमध्ये पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी २३.८८ गुण मिळाले आहेत. तर सुरक्षेसाठी या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह EBD आणि एअरबॅग्जची सुविधा आहे.
(हे ही वाचा :शाहरुख खान ब्रँड ॲम्बेसेडर असलेली लोकप्रिय Hyundai ची कार कंपनीने गुपचूप केली बंद; कारण काय? )
Skoda Superb ला ग्राहक मिळत नाहीत
Skdoa Superb ही अतिशय प्रीमियम लक्झरी सेडान कार आहे. यामध्ये अनेक अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत पण त्यानंतरही त्याची विक्री काही विशेष नाही. गेल्या महिन्यात केवळ ४ युनिट्सची विक्री झाली होती तर गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीने १३ युनिट्सची विक्री केली होती. सुपर्बमध्ये सुरक्षेसाठी ६ एअरबॅग देण्यात आल्या आहेत. घसरत्या विक्रीला चालना देण्यासाठी कंपनी या सेगमेंटमध्ये नवीन कार सादर करण्यावर काम करत आहे. वास्तविक, ही कंपनीच्या Octavia ची नवीन आवृत्ती असेल. ही कार पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक लूकमध्ये सादर केली जाऊ शकते.
Skoda ची नवीन Octavia १.५-लीटर पेट्रोल आणि २.०-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह लाँच केली जाऊ शकते. ही हायस्पीड माइल्ड हायब्रीड कार असेल. इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सौम्य हायब्रिडमध्ये दिली आहेत. यामुळे पेट्रोलचा वापर कमी होतो आणि कारचा रनिंग कॉस्ट कमी होतो. सौम्य हायब्रिड कारमध्ये मजबूत हायब्रिड कारपेक्षा कमी क्षमतेच्या बॅटरी असतात.