Car Sales Around Diwali Has Fallen So Low : सणासुदीच्या काळात नवनवीन वस्तू खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते, त्यामुळे भारतात सणासुदीला सुरुवात होताच विविध कंपन्या डिस्काउंट ऑफर करत असतात. कारण या काळात दुचाकीपासून ते चारचाकीपर्यंत अनेक जण नवीन कार खरेदी करतात. पण, यंदा सणासुदीच्या हंगामात कारची विक्री कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे (Car Sales In Festive Season Low) . तर नेमकं यामागचं कारण काय? हे आपण बातमीतून सविस्तर जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीच्या काळात गाड्या विकण्याची संख्या खूपच कमी झाली आहे (Car Sales In Festive Season Low) , ज्यामुळे डीलर्सना ८० ते ८५ दिवसांच्या सर्वात जास्त स्टॉकचा सामना करावा लागतो. या स्टॉकमध्ये एकूण ७.९० लाख गाड्या आहेत, ज्यांची एकूण किंमत ७९,००० कोटी आहे, असे इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात सांगितले जात आहे.

याचे मुख्य कारण असे की, गाडी निर्माता कंपन्यांनी कमी विक्रीच्या काळात गाड्या जास्त प्रमाणात पाठवल्या. तसेच विक्रीमध्ये १८.८१ टक्क्यांची घट झाली आहे (Car Sales In Festive Season Low) , असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन्स (FADA) च्या आकडेवारीत सांगितले आहे. त्याचप्रमाणे असेही सांगण्यात येत आहे की, या वर्षी मे महिन्यापासूनच कार विक्रीत मंदी सुरू झाली होती आणि तेव्हापासून गाड्यांच्या इन्व्हेंटरीमध्ये वाढ झाली.

हेही वाचा…“अलेक्सा रॉकेट लाँच कर…” मालकाने सूचना देताच फटाके फोडण्यासाठी Alexa तयार, पाहा दिवाळीचा हा खास VIRAL VIDEO

१० ते २५ लाख रुपये किमतीच्या गाड्यांच्या विक्रीतही मंदी :

आश्चर्याची बाब म्हणजे, १० ते २५ लाख रुपये किमतीच्या गाड्यांच्या विक्रीतही यंदा मंदी दिसून आली. असे होण्यामागचे महत्त्वाचे कारण असे आहे की, गाड्यांचा हा सेगमेंट महामारीनंतर विक्री वाढवण्यात मुख्य भूमिका बजावत होता. त्याचप्रमाणे अतिवृष्टी आणि तापमानातील बदल हे गाडी खरेदी करणाऱ्यांनी त्यांच्या खरेदीला पुढे ढकलण्याचे एक कारण म्हणून सांगितले जात आहे. कारण या वर्षी उन्हाळा, त्यानंतर जोरदार पावसाळा आला. पण, नवीन मॉडेल्स, जसे की मारुती सुझुकी फ्रॉन्क्स आणि नुकतेच लाँच झालेले टाटा कर्व्ह यांच्या मागणीवर फारसा परिणाम झालेला नाही.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car sales in festive season low around diwali all time high inventory of 80 to 85 days which adds up to seven point nine lakh vehicles asp