भारतात दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातात जीव गमावतात. भारतातील रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जगातील सरासरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.  प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन सरकारने अलीकडेच कारमध्ये सहा एअर बॅग असाव्यात, असं बंधन घातलं आहे. आपल्याला माहित आहे की, एअरबॅग (Airbags) हे कारचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 

अपघातादरम्यान चालक किंवा प्रवाशाला गंभीर दुखापतीपासून वाचवता येऊ शकते, या संकल्पनेतून १९८० च्या दशकात एअर बॅग ही प्रणाली विकसित झाली. मात्र, अलीकडच्या काळात या एअर बॅगचे महत्त्व वाढत आहे. नवीन येणाऱ्या मध्यम प्रकारातील प्रत्येक वाहनात दोन ते सातपर्यंत एअर बॅग असतात. अनेक मोठ्या अपघातांत या बॅगमुळे अनेकांचे जीव वाचल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे सुरक्षा कवच म्हणून अलीकडे एअर बॅगकडे पाहिले जाते.प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन सरकारने सर्व कारसाठी ड्रायव्हर साइड एअरबॅग अनिवार्य केले. १ जानेवारी २०२२ पासून प्रवाशांना एअरबॅग्ज देखील अनिवार्य करण्यात आल्या आहेत. 

Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा

(हे ही वाचा : तुमच्या सुरक्षिततेसाठी काhttps://www.loksatta.com/auto/additional-airbag-in-a-vehicle-will-increase-the-cost-of-the-vehicle-only-by-rs-800-per-airbag-pdb-95-3759592/रमध्ये असणाऱ्या एअरबॅग्सची किंमत किती माहितेय का? आकडा वाचून व्हाल थक्क )

नितीन गडकरींनी केली सूचना

कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेकडे गडकरींनी लक्ष देण्याची सूचना केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व वाहन निर्माता कंपन्यांनी बेस व्हेरिअंटपासून कमीतकमी सहा एअरबॅग त्यांच्या वाहनांमध्ये द्याव्यात अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली आहे. भारत सरकार देशात विकल्या जाणाऱ्या कार अधिक सुरक्षित करण्यावर भर देत आहे. सरकारने सर्व कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य केलं आहे. अपघात झाल्यास एअरबॅग ताबडतोब उघडतात आणि गाडीच्या चालकासह प्रवाशांचे प्राण वाचवतात. त्यामुळे वाहनांमध्ये सहा एअरबॅग्स देणं अनिवार्य केलं आहे. 

तुमच्या गाडीतील ​एअरबॅग कसे काम करते?

जेव्हा एखादी कार दुसऱ्या वाहनाला, झाडाला, भिंतीला धडकते तेव्हा अचानक कारचा वेग कमी होतो. वेगातील हा अचानक झालेला बदल Accelerometer ओळखतो. यानंतर, एक्सीलरोमीटर एअरबॅगच्या सर्किटमध्ये सेन्सर सक्रिय करतो. एअरबॅग सर्किट सेन्सर अॅक्टिव्ह होताच हीटिंग एलीमेंटद्वारे करंट (इलेक्ट्रिसिटी) जनरेट होतो. त्यामुळे एक स्फोट होऊन एअरबॅग्समध्ये गॅस तयार होतो. ज्यामुळे कंपनीने एअरबॅग म्हणून वापरलेली नायलॉनजी पिशवी फुगते. या पिशवीमुळे चालक किंवा इतर प्रवाशी कारचं स्टीयरिंग, समोरची काच किंवा सीटवर आदळत नाहीत. विशेष म्हणजे चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाने सीटबेल्ट देखील लावला असेल तर तो अधिक सुरक्षित राहतो.

गाडीमध्ये एअर बॅग असल्यास सीट बेल्ट घालण्याची गरज नाही का?

सीट बेल्ट हे प्रत्येक कारमध्ये दिलं जाणारं सर्वात बेसिक पण महत्त्वाचं सेफ्टी फीचर आहे. सीट बेल्ट आणि एअरबॅग एकत्र काम करतात. भारतातील बहुतेक कार सर्व सीटवर ड्युअल एअरबॅग आणि सीट बेल्टसह येतात. सेट बेल्ट ऑन नसला तरी एअरबॅग्ज काम करतात. मात्र, एअर बॅग हे तुमचा जीव वाचवण्याचं एकमेव साधन नाही. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे एअरबॅगवर अवलंबून राहू शकत नाही.

कारमधील एअर बॅगमुळे अपघातात प्रवाशाला गंभीर दुखापतीपासून वाचवता येऊ शकते. कधीही कार चालवताना प्रथम प्राधान्य हे सीट बेल्ट लावून दक्षता घेण्यालाच आहे. अपघात झाल्यानंतर वाहन चालक हा स्टेअरिंगवर आदळतो. याच दरम्यान एअर बॅग उघडल्यास त्यामुळे उलट जास्त इजा होण्याची शक्यता असते. पण सीट बेल्ट घातलेला असल्यास आपण समोर आदळत नाही आणि एअर बॅगचं कामही योग्यरित्या पार पाडलं जातं आणि प्रवाशी सुरक्षित राहू शकतो. म्हणजचे सीट बेल्टशिवाय एअरबॅगसुद्धा तुमचा जीव वाचवू शकत नाहीत.