Car tip to remove dent : वाहन चालविताना आपण त्या गाडीला कोणतीही इजा होणार नाही, वाहनाबरोबर कोणतीही दुर्घटना होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेत असतो. मात्र, कधी कधी आपला अंदाज चुकतो आणि गाडीचे दार कुठेतरी आपटते. अथवा आपण काळजी घेऊनदेखील इतर चालकांचा त्यांच्या गाडीवर ताबा राहत नाही आणि ट्रॅफिकमध्ये असताना मागून एखादी गाडी आपल्या गाडीवर आपटते. किंवा एखाद्या वळणावर दुसऱ्या गाडीने कोणतीही पूर्वसूचना न देता, अचानकपणे वळवल्यास त्यांच्या वाहनाची धडक किंवा टक्कर आपल्या वाहनाला बसून आपली गाडी खराब होते आणि त्यावर डेन्ट पडतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चारचाकी वाहनावर किंवा कोणत्याही गादीवर पडलेले असे डेन्ट काढणे म्हणजे विनाकारण खर्चात भर पडण्यासारखे आहे. कारण- तुम्ही जर गाडीवर पडलेला तो डेन्ट काढण्यासाठी मेकॅनिककडे गेलात, तर तिथे सहज काही हजार रुपयांना फोडणी बसते. मात्र, घरातील केवळ एक पदार्थ वापरून, काहीही पैसे खर्च न करता, तुमच्या चारचाकी वाहनावरील डेन्ट कसा काढता येऊ शकतो, हे आज आपण पाहणार आहोत. तर हा जादुई उपायातला आवश्यक घटक म्हणजे पाणी! पाण्याचा वापर करून गाडीवरील डेन्ट कसा काढायचा ते पाहा.

हेही वाचा : Car tips : ‘बुरा ना मानो होली है!’ पण गाडीवर रंग उडाला तर? होळीआधी पाहा ‘या’ टिप्स

गाडीवरील डेन्ट कसा काढायचा?

  • सर्वप्रथम एखाद्या पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवा.
  • आता बुडबुडे येऊन उकळू लागलेले पाणी तुमच्या चारचाकी वाहनाजवळ घेऊन या.
  • गाडीवर ज्या ठिकाणी डेन्ट पडला आहे तिथे ते उकळते गरम पाणी हळूहळू ओता. पाणी गाडीवर ओतत असताना ते आपल्या अंगावर उडणार नाही याची काळजी घ्या.
  • आता गाडीवर पाणी ओतून झाल्यावर टॉयलेट साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लंजर [toilet plunger] गाडीच्या डेन्टवर लावून आरामात तुमच्या दिशेने ओढा. ही क्रिया साधारण दोन ते तीन वेळा करून पाहा. किंवा जोपर्यंत डेन्ट निघत नाही तोपर्यंत प्लंजरचा वापर करावा.
  • गरम पाणी आणि प्लंजर यांच्या मदतीने अगदी काही मिनिटांत तुमच्या गाडीवरील डेन्ट अगदी झटपट निघून जातील.

हेही वाचा : Electric vehicle tips : या गाड्यांना कधीच करू नका १०० टक्के चार्ज! पाहा चार महत्त्वाच्या चार्जिंग टिप्स

बोनस टीप

जर तुमच्या गाडीच्या मागच्या भागावर डेन्ट पडला असेल, तर त्यावर गरम पाणी ओतून शक्य असल्यास गाडीच्या खालच्या भागातून जिथे डेन्ट आहे तिथला भाग हाताने बाहेरच्या दिशेने ढकलता येऊ शकतो.

गाडीवरील डेन्ट काढण्यासाठी वर सुचवलेला, एकही रुपया खर्च न करता आणि अत्यंत सोपा, उपयुक्त असा हा उपाय यूट्यूबवरील @AdamWasHere नावाच्या चॅनेलने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३८ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car tips how to get rid of dent in car use this simple water technique follow the steps dha