Car Washing Tips: जेव्हा एखादी व्यक्ती नवीन कार घेते तेव्हा तो तिची खूप काळजी घेतो, परंतु कालांतराने त्याची देखभाल आणि स्वच्छतेकडे फारसे लक्ष देत नाही. लोक पाण्याचा वापर करून गाड्या धुतात, या पाण्याच्या फोर्समुळे अनेकदा गाडीच्या अशा भागांमध्ये पाणी जाते जिथे पाण्याचा थेंबही जायला नको. असे केल्याने गाडीचा तो नाजूक भाग खराब होऊ शकतो. म्हणूनच आज आपण कारमधील अशा भागांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे पाण्याचा एक थेंबही जाऊ देणं धोकादायक ठरेल.
इंजिन, बॅटरी आणि फ्यूज बॉक्स
इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये पाणी शिरल्याने वाहनातील सर्व इलेक्ट्रॉनिक्सचे नुकसान होऊ शकते. यामुळे इंजिन सुरू न होण्यापासून ते बॅटरी खराब होण्यापर्यंतच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे इंजिन आणि बॅटरीजवळ पाणी जाऊ नये, याची काळजी घ्यावी.
एअर इनटेक आणि एसी व्हेंट्स
एअर इनटेक किंवा एसी व्हेंटमध्ये पाणी शिरल्याने इंजिन आणि एसी सिस्टमला नुकसान होऊ शकते. यामुळे इंजिनची कार्यक्षमता तर बिघडतेच पण दीर्घकाळात एसीचेही नुकसान होऊ शकते.
डोअर पॅनेल्स आणि विंडो डिटेल्स
कारच्या दरवाज्याच्या आजूबाजूच्या भागात पाणी घुसल्याने दरवाजांचे फिनिशिंग हळूहळू खराब होऊ शकते आणि गंजण्याची समस्या देखील होऊ शकते. खिडकीचे बिजागर आणि दरवाजे यांचे सिलिकॉन सील पाण्याने भिजल्यास ते खराब होऊ शकतात.
ब्रेक आणि व्हील हब
ब्रेक सिस्टमला पाण्यापासून संरक्षित केले पाहिजे, कारण ते ब्रेक पॅडच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. व्हील हब आणि रोटर्समध्ये पाणी शिरल्याने गंज येण्याचा धोका वाढतो.
इंटिरियर्स
कारचे आतील भाग स्वच्छ करताना, विशेषत: इलेक्ट्रिक कारमध्ये, सीटवर पाणी जाऊ नये. इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सचे पाण्याशी संपर्क आल्यास गंभीर नुकसान होऊ शकते.
एक्झॉस्ट पाईप
एक्झॉस्ट पाईपमध्ये पाणी शिरल्यास पाईप्स गंजण्याची शक्यता असते. हे एक्झॉस्ट सिस्टमच्या मुक्त प्रवाहाला देखील नुकसान करू शकते, ज्यामुळे तुमच्या कारच्या इंजिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
काय करावे
- कार धुताना ओल्या कापडाचा वापर करा
- गाडी स्वच्छ करण्यासाठी विशेष क्लीन्सर वापरा.
- इलेक्ट्रिक्स पार्ट्सच्या बाजूचा भाग स्वच्छ करण्यासाठी, पाण्याऐवजी विशेष क्लीन्सर वापरा.
- विशेषतः इंजिन आणि इलेक्ट्रिकल भागांवर थेट स्प्रेमधून पाणी कधीही ओतू नका.