Cheapest 7 Seater MPV in India:   देशात अनेक असे लोक आहेत, ज्यांचं कुटुंब मोठं आहे आणि त्यांना 7 सीटर कार खरेदी करायची आहे. मात्र कमी बजेट असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही. मारुती सुझुकीच्या XL6 आणि Ertiga या कारची सुरुवातीची किंमत सुमारे ९ लाख रुपयांपासून ते १३ लाख रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत ते सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर जाते. तुमच्या बाबतीतही असेच असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण वाहन बाजारात अशी एक ७ सीटर कार आहे, ज्याची किंमत खूपच कमी आहे. यासोबतच यामध्ये जबरदस्त मायलेजही मिळतो. चला तर मग 7 सीटर पर्यायामध्ये उपलब्ध असलेली स्वस्त कार पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार

आम्ही ज्या MPV बद्दल बोलत आहोत त्याचे नाव Renault Triber आहे. ही एक एंट्री लेव्हल MPV आहे. रेनॉल्टची ही एमपीव्ही कार देशात खूप लोकप्रिय आहे. या कारची खरेदीही मोठ्या प्रमाणात होते. कारला १.० लीटर ३ सिलेंडर, Natural Aspirated पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन ७२ पीएस पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये ६-वे अॅडजस्टेड ड्रायव्हर सीट, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम ही फीचर्स आहेत. यासोबतच या कारमध्ये ८४ लीटर बूट स्पेसही देण्यात आली आहे.

(हे ही वाचा : बाकी ईव्हींची उडाली झोप, देशात ‘या’ दोन लक्झरी कारचे बुकींग सुरु, लूक पाहून पडाल प्रेमात, एकदा चार्ज केल्यानंतर धावेल… )

सुरक्षितता

सुरक्षेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला त्यात ४ एअरबॅग (२ फ्रंट, २ साइड) मिळतात. ग्लोबल NCAP ने कारला प्रौढांसाठी ४ स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी ३ स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे.

किंमत

Renault Triber या सात सीटर कारची किंमत ६.३३ लाख रुपये आहे.