Most affordable EV in India: एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) ने भारतीय बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV लाँच केल्यानंतर कंपनीने कारची बुकिंग प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, टाटाच्या ईव्हीलाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. आणखी एका कारबाबत बाजारात खळबळ उडाली आहे. आता ही कार महिंद्रा लाँच करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. असे मानले जात आहे की, ज्या प्रकारे परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे, अशा परिस्थितीत कार कंपन्या आता १० लाख रुपयांपेक्षा स्वस्त ईव्ही आणण्याची तयारी करत आहेत.

महिंद्रा अँड महिंद्राची ही कार इलेक्ट्रिक कार असेल. आता महिंद्रा अँड महिंद्रा आगामी काळात आपली परवडणारी इलेक्ट्रिक कार KUV100 इलेक्ट्रिक देखील लाँच करू शकते असे वृत्त आहे. महिंद्रा EKUV100 ची ग्राहकही आतुरतेने वाट पाहत आहेत. ही कार ऑटो एक्सपो २०२० मध्ये पाहिल्या गेल्याची माहिती आहे.

Budget 2025 Prices of Electric vehicles to get cheaper
Budget 2025 : इलेक्ट्रिक वाहनांबाबत निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा! अर्थसंकल्पातील निर्णयामुळे सर्वसामान्यांना मिळणार ‘हे’ फायदे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Despite government announcement smart prepaid meters are being distributed secretly causing unemployment for contract meter readers
राज्यभरात यंदा वीज देयक वेळेवर नाही… संतप्त कंत्राटी मीटर वाचक…
mahavitaran latest news in marathi
पुणे : घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात
Countrys first lithium refinery and battery manufacturing plant in Butibori
रोजगार संधी! बुटीबोरीत देशातील पहिला लिथियम रिफायनरी, बॅटरी उत्पादन कारखाना
navi mumbai municipal administration once again started activities to set up charging stations at 124 places in the city
१२४ ठिकाणी नवी चार्जिंग स्थानके, इलेक्ट्रिक वाहन धोरणासाठी नवी मुंबई महापालिकेचा पुन्हा प्रयत्न
thief stealing mobile phones from passengers at swargate st station arrested
एसटी स्थानकात प्रवाशांकडील मोबाइल चोरणारा गजाआड; ४३ मोबाइल संच जप्त
Komaki SE series electric scooters
Komaki SE series: सिंगल चार्जवर १२० किलोमीटरपर्यंतची रेंज; सुरक्षेसाठी ‘हे’ फीचर; भारतात लाँच झाली इलेक्ट्रिक स्कूटर

(हे ही वाचा : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारचे बुकिंग सुरू, पहिल्या ५,००० ग्राहकांसाठी विशेष ऑफर, ५१९ रुपयांमध्ये पळवा महिनाभर )

Mahindra eKUV100 इलेक्ट्रिक कारमध्ये काय असेल खास?

महिंद्राची आगामी इलेक्ट्रिक कार Mahindra eKUV100 मध्ये एक शक्तिशाली बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, ज्याची बॅटरी एका चार्जवर २०० किलोमीटरपेक्षा जास्त असू शकते. हे ४० kW इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित असू शकते जे ४० bhp कमाल पॉवर आणि १२० Nm पीक टॉर्क जनरेट करेल. तुमच्या घरी एसी चार्जरच्या मदतीने तुम्ही ही इलेक्ट्रिक कार ६ तासांपेक्षा जास्त वेळेत पूर्णपणे चार्ज करू शकाल. यामध्ये DC फास्ट चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही एका तासात ८० टक्क्यांपर्यंत सहज चार्ज करू शकता.

Mahindra eKUV100 इलेक्ट्रिक कार किंंमत

Mahindra eKUV100 इलेक्ट्रिक कारची किंमत ८ लाखांपेक्षाही कमी असण्याची शक्यता आहे.

Story img Loader