Cheapest electric car in India: देशात आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने लाँच होत आहेत. नवीन मॉडेल्स कार मार्केटमध्ये येत आहेत. तसंच भारतात अनेक इलेक्ट्रिक कार आहेत ज्या बजेट रेंजमध्ये उपलब्ध आहेत, तथापि आता सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Ligier Mini EV लवकरच देशात लॉंच केली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक कारची किंमत फक्त १ लाख रुपये असू शकते असा दावा केला जात आहे. या कारच्या लॉंचनंतर या प्रकरणात किती तथ्य आहे हे समोर येईल, सध्या ग्राहक या इलेक्ट्रिक कारची वाट पाहत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किती रेंज ऑफर करेल?

मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक कारची सिंगल चार्जवर ६३ किलोमीटर ते १९२ किलोमीटरची रेंज आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतात या कारची किंमत १ लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे. जे लोक स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही इलेक्ट्रिक कार एक चांगला पर्याय ठरू शकते.

हेही वाचा… आता चहा आणि कॉफीसाठी कारमधून उतरायची गरज नाही! Hyundai Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर

बॅटरी डिटेल्स

माहितीनुसार, Ligier Mini EV G.OOD, I.DEAL, E.PIC आणि R.EBEL सारख्या ४ प्रकारांमध्ये लॉंच केली जाऊ शकते. या व्हेरिएंट्सनुसार, बॅटरी पॅक पर्याय देखील उपलब्ध असतील ज्यामध्ये 4.14 kWh, 8.2 kWh आणि 12.42 kWh सह 3 बॅटरी पॅक पर्याय मिळू शकतात.

डिझाइन, इंटेरियर आणि फीचर्स

Ligier Mini EV च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ती खूपच लहान असेल, त्याच्या लहान आकारामुळे, त्यात जास्त बसण्याची क्षमता नसेल, असे असूनही, ग्राहकांना लांबी २९५८मिमी, रुंदी १४९९मिमी आणि उंची १५४१ मिमीचं डायमेन्शन मिळू शकतं. युरोपियन मॉडेलवर आधारित या इलेक्ट्रिक कारला फक्त दोन दरवाजे असतील. यात १२ ते १३ इंच चाके असू शकतात.

हेही वाचा… HONDA ची बम्पर ऑफर! नववर्षात ‘या’ ३ गाड्यांवर ९०,००० पर्यंत डिस्काउंट, होईल पैशांची बचत

कारच्या फ्रंटला एलईडी डीआरएल आणि राउंड हेडलाइट्स आणि स्लिम ग्रिल दिसतील आणि गोल एलईडी टेललाइट्स असू शकतात. याचा साईड लूक थोडा स्पोर्टी असेल.

Ligier Mini EV चे इंटेरियर स्पोर्टी असेल. यात १० इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटो सपोर्ट, पॉवर स्टीयरिंग, ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोलसोबत हीटेड ड्रायव्हर सीट आणि कॉर्नर एसी वेंटसारखे फिचर्स बघायला मिळतील. असं मानलं जात आहे की या कारला यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केले जाऊ शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range dvr