Cheapest Electric Scooters in India: भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर्सचा बाजार दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. अनेक मोठ्या वाहन निर्मात्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांसह मैदानात उतरत आहेत. आता देशात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. नवनवीन मॉडेल्स सातत्याने लाँच होत आहेत. आता इलेक्ट्रिक स्कूटरची किंमतही पेट्रोल स्कूटरच्या बरोबरीने आली आहे. Ola, Ather, Bajaj आणि TVS सारख्या कंपन्यांनी त्यांच्या स्कूटरच्या किमती कमी केल्या आहेत. तुम्ही जर एखादी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यामध्ये आम्ही तुमच्यासाठी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सची माहिती घेऊन आले आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कायनेटिक ई-लुना

इलेक्ट्रिक लुना ही परवडणारी मोपेड आहे. याची किंमत ६९,९९० रुपयांपासून सुरू होते. यात २kwh लिथियम आयन बॅटरी आहे आणि एका चार्जवर ११० किलोमीटरपर्यंतची रेंज देते. पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे ४ तास लागतात. त्याचा टॉप स्पीड ५० किलोमीटर प्रति तास आहे. १० रुपये खर्च करुन १०० किलोमीटर धावेल, असा कंपनीचा दावा आहे. यात मोठी १६ इंची चाके आहेत. चांगल्या राइडसाठी, समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन आहे.

(हे ही वाचा : होंडा, बजाज फक्त पाहतच राहिल्या! ७४ हजाराच्या ‘या’ बाईकला खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा, ३० दिवसात ३ लाखांहून अधिक विक्री )

ओला S1

ओलाचा S1 या स्कूटरची किंमत ६९,९९९ रुपये आहे. म्हणजेच या किमतीत येणारी ही पहिली हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर असेल. यात २kWh बॅटरी पॅक आहे. ही स्कूटर फुल चार्ज केल्यावर ९५ किलोमीटरची रेंज देते. यात ४.३ इंच डिस्प्ले आहे, त्याचा टॉप स्पीड ८५kmph आहे. ही स्कूटर ज्या किमतीत फीचर्स देत आहे, त्याला सर्वोत्तम पर्याय म्हणता येईल.

TVS iQube

TVS iQube मध्ये ३. kwh चा बॅटरी पॅक आहे. ही स्कूटर १.२० लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. ही हायस्पीड स्कूटर फक्त ४.२ सेकंदात ० ते ४०km/चा वेग वाढवते. स्कूटरचा टॉप स्पीड ७८ किमी/तास आहे. हे एका चार्जवर १०० किलोमीटरची रेंज देते. यात अलॉय व्हील, डिस्क ब्रेक आणि ड्युअल कलर पर्याय आहे. ही स्कूटर ५ इंच डिस्प्ले आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह दिली जात आहे.

बजाज चेतक 2901

बजाजची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आता आणखी स्वस्त झाली आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर सुमारे १२३ किमी चालेल. ही स्कूटर ९५,९९८ रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला त्याची डिझाईन आवडेल यात डिजिटल कन्सोल आहे. याशिवाय स्कूटरमध्ये एलईडी लाइट्स आणि डिझायनर टेललाइट्स देण्यात आले आहेत.

यात इको आणि स्पोर्ट्स असे दोन रायडिंग मोड असतील. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर सुमारे १२३ किमी चालेल. ही स्कूटर ९५,९९८ रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. बजाज चेतक २९०१ मध्ये २.९ kWh बॅटरी पॅक आहे, ही मिड सेगमेंट स्कूटर ६३ kmph चा टॉप स्पीड देते. सहा तासांत ते पूर्णपणे चार्ज होते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheapest electric scooters in india here are price engine features pdb
Show comments