Cheapest Petrol In India: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी लोकांचे बजेट बिघडवले आहेत. परंतु, भारतातील एक असे शहर आहे जिथे पेट्रोलचे दर दिलासा देणारे आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जास्त वाढ केलेली नाही. सध्या भारतातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत प्रति लिटर ९१.४५ रुपये आहे. दुसरीकडे, भारतातील सर्वात महाग पेट्रोल परभणी, महाराष्ट्र येथे विकले जात आहे जिथे किंमत १२३.४७ रुपये प्रति लिटर आहे. राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर, सोमवारी येथे एक लिटर पेट्रोलची किंमत १०५. ४१ रुपये आहे, तर मुंबईत पेट्रोलची किंमत १२०.५१ रुपये प्रति लिटर आहे.
इतर शहरांममधील इंधनाचे दर काय आहेत?
डिझेलच्या दरावर नजर टाकली तर राजधानी दिल्लीत ९६.६७ रुपये प्रति लीटर विकले जात आहे, तर मुंबईत डिझेल १०४.७७ रुपये प्रति लिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ११५.१२ प्रति लीटरवर पोहोचला आहे, तर डिझेल ९९.८३ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे प्रतिलिटर दर अनुक्रमे ११०.८५ रुपये आणि १००.९४ रुपयांवर आले आहेत.
(हे ही वाचा: Petrol- Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव)
दरवाढीचे कारण काय?
केंद्र सरकारने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे भारतात इंधनाचे दर कमी झालेले नाहीत.