Best-selling two-wheeler brands in April 2023: भारतात कार आणि टू-व्हीलर खरेदी करताना अनेक ग्राहक सर्वात आधी त्याचे मायलेज पाहतात. कमी किंमतीत चांगले मायलेज मिळत असेल तर त्या बाइकला खरेदी करतात. गेल्या एप्रिलचा महिना भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी चांगला ठरला आहे. वाहन उत्पादकांनी प्रवासी वाहने तसेच दुचाकी वाहनांच्या विभागांमध्ये वर्ष-दर-वर्ष आधारावर चांगली वाढ नोंदवली आहे. Hero MotoCorp च्या विक्रीत घट झाली असली तरी दुचाकींच्या क्षेत्रात ती आघाडीवर आहे. बजाज, TVS आणि रॉयल एनफिल्डने देशांतर्गत विक्रीत वाढ नोंदवली परंतु Hero MotoCorp च्या मागे आहेत. चला, तर मग २०२३ मध्ये भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या दुचाकी ब्रँडबद्दल जाणून घेऊया…

Hero MotoCorp

Hero MotoCorp ने एप्रिल २०२३ मध्ये देशांतर्गत बाजारात ३,८६,१८४ युनिट्सची विक्री केली आहे. तथापि, त्याच्या विक्रीत ३.०९% (वार्षिक आधारावर) घट नोंदवली गेली. गेल्या वर्षी याच कालावधीत (एप्रिल २०२२) ३,९८,४९० युनिट्सची विक्री झाली होती.

Bike caught a fire alive man burnt in fire viral video on social media
VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
table no 21 joker blind psycholigical thrillers on ott
‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या

Honda Motorcycle & Scooter India 

Honda Motorcycle & Scooter India (HMSI) ने गेल्या महिन्यात (एप्रिल २०२३) ३,३८,२८९ युनिट्सची विक्री केली, जी वार्षिक ६.१४ टक्क्यांची वाढ दर्शवते. गेल्या वर्षी याच कालावधीत (एप्रिल २०२२) तिची देशांतर्गत विक्री ३,१८,७३२ युनिट्स होती.

(हे ही वाचा : ४ लाखाच्या ‘या’ मारुती कारनं ग्राहकांना लावलं वेड, ३० दिवसातच १४ व्या स्थानावरुन पोहोचली सातव्या स्थानी, मायलेज २४ kmpl )

TVS Motor Company 

TVS मोटर कंपनीने एप्रिल २०२३ मध्ये २,३२,९५६ युनिट्सची विक्री केली आहे. त्याच्या विक्रीत २९.०२ टक्क्यांनी वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत (एप्रिल २०२२) तिची देशांतर्गत विक्री १,९६,५९६ युनिट्स होती.

Bajaj Auto 

बजाज ऑटोने एप्रिल २०२३ मध्ये १,८१,८२८ दुचाकी विकल्या आहेत. त्याच्या देशांतर्गत विक्रीत ९५.०२ टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत (एप्रिल २०२२) ९३,२३३ युनिट्सची विक्री झाली होती.

Royal Enfield 

रॉयल एनफिल्डने या वर्षी एप्रिलमध्ये ६८,८८१ युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी (एप्रिल २०२२) याच कालावधीत ५३,८५२ युनिट्सची होती. म्हणजेच, वर्षभराच्या आधारावर त्याच्या विक्रीत २७.९१ टक्क्यांची वाढ झाली आहे.