Sodium-ion Battery Electric Car: इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढत आहे, मात्र तिची किंमत जास्त असल्याने ग्राहक अजूनही त्या खरेदी करणे टाळत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीमध्ये सर्वात मोठा खर्च त्याच्या बॅटरीवर होतो. सध्या, लिथियम-आयन बॅटरी वाहनांमध्ये वापरली जातात, परंतु लवकरच हे बदलणार आहे. चीनची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी JAC ने कमी किमतीच्या सोडियम-आयन बॅटरीवर चालणारे जगातील पहिले इलेक्ट्रिक वाहन सादर केले आहे. या बॅटरीचा वापर करून भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांची किंमत १० टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते.

सोडियम-आयन बॅटरी स्वस्त कच्चा माल वापरतात आणि मुख्य घटक म्हणून लिथियम आणि कोबाल्टवर अवलंबून असलेल्या विद्यमान तंत्रज्ञानासाठी ईव्ही उत्पादकांना पर्याय देऊ शकतात. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, सोडियम-आयन बॅटरी बीजिंग-आधारित स्टार्टअप हिना बॅटरी टेक्नॉलॉजीजने विकसित केली आहे.

Maruti Suzuki First electric car e Vitara
e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये करणार लाँच; पण, किंमत काय असणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
electricity cost hike
वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
highest paid man in the world
तासाला दोन कोटी, तर वर्षाला १७ हजार कोटी; जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग कोण आहेत?

(हे ही वाचा : स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ दोन कारवर मिळतोय तब्बल २ लाखांचा डिस्काउंट, ऑफरचे केवळ दोनच दिवस बाकी )

JAC EV मध्ये २५ किलोवॅट तास (kWh) बॅटरी आहे, जी एका चार्जवर २५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. “गेल्या वर्षी लिथियम कार्बोनेटच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे अनेक बॅटरी निर्माते आणि ग्राहकांना वाढत्या खर्चाच्या दबावाला सामोरे जावे लागले,” असे कंपनीने म्हटले आहे. “म्हणून सोडियम-आयन बॅटर्‍या लिथियम-आयन बॅटर्‍यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत, जे उत्तम खर्च-कार्यप्रदर्शन, उच्च सुरक्षा तसेच उत्कृष्ट सायकल कामगिरी देतात.”

सोडियम-आयन बॅटरीची घनता त्यांच्या लिथियम-आयन समकक्षांपेक्षा कमी असते. या बॅटरीचे कमी-तापमान कार्यप्रदर्शन आणि चार्जिंग गती यासारखे फायदे आहेत. दरम्यान, चीनची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी BYD परदेशात कामाचा विस्तार करत आहे.

Story img Loader