सिट्रोएनने भारत लिमिटेड एडिशन C3 एअरक्रॉस धोनी एडिशन लाँच केलेीआहे, ज्याची सुरुवातीची किंमत ११.८२ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. हे १८ जूनला संपूर्ण भारतामध्ये सिट्रोएन डीलरशिप सुरू केली आहे. स्पेशल एडिशन एसयूवीचे नाव C3 एअररॉस ७ धोनी एडिशन आहे. पूर्व भारतीय क्रिकेट कप्तान महेंद्र सिंह धोनी जर्सीवर आधारित, लिमिटेड एडिशन एसयूवी फक्त ५+२ सीटिंग कॉन्फिग्रेशन उपलब्ध आहे.

Citroen C3 Aircross Dhoni एडीशन: नवीन काय आहे?

Citroen ने C3 Aircross Dhoni Edition मध्ये डॅशकॅम, कुशन पिलो, सीट बेल्ट कुशन आणि इल्युमिनेटेड स्टेप बोर्ड अशी अनेक नवीन वैशिष्ट्ये दिली आहेत. मध्यम आकाराच्या एसयूव्हीमध्ये एक विशिष्ट ड्युअल-टोन पांढरे छप्पर आणि निळा रंगांची कार बॉडी आहे. साइड पॅनेल्स, समोरच्या दरवाजाच्या सिल्समध्ये धोनी एडिशन स्टिकर्सआहेत आणि मागील दरवाजाच्या सिल्समध्ये ७ अंकाचे ग्राफिक आहेत.

हेही वाचा – Limousine Aurus Senat : पुतिन यांनी किम जोंग यांना दिली आलिशान कार भेट; बुलेटप्रूफ कारचे फीचर्स अन् किंमत वाचून थक्क व्हाल

या सी३ एअरक्रॉसच्या स्पेशल एडिशनच्या १०० भाग्यवान मालकांना, फ्रेंच ऑटोमोबाईल उत्पादक धोनीने स्वाक्षरी केलेले विकेट-कीपिंग ग्लोव्हज देणार आहे.

हेही वाचा –६९ हजार रुपये किंमत, एका चार्जवर धावेल ११० किलोमीटर; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा यादी

Citroen C3 Aircross धोनी एडीशन: तपशील

स्टँडर्ड सी३ एअरक्रॉस प्रमाणे, धोनी एडिशन १.२-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जे ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर दोन्हीशी जोडलेले आहे. पॉवर प्लांटचा आउटपुट १०८ bhp आहे, परंतु टॉर्क मॅन्युअलमध्ये १९०Nm आणि ऑटोमॅटिकमध्ये २०५ Nm आहे.

Citroën C3 Aircross धोनी एडिशन लाँच करताना, शिशिर मिश्रा, ब्रँड डायरेक्टर, Citroën India, म्हणाले, “आम्ही C3 Aircross चे खास ‘धोनी एडिशन’ सादर करताना आनंद होत आहे, जे केवळ १०० युनिट्सच्या मर्यादित रनमध्ये उपलब्ध आहे. आमचा ब्रँड ॲम्बेसेडर धोनी लवचिकता, नेतृत्व आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. त्याचे हे गुण सिट्रोएनच्या समर्पणाशी पूर्णपणे जुळणारे आहेत. ही दुर्मिळ मर्यादित आवृत्ती म्हणजे धोनीच्या गौरवशाली प्रवासाला अनोखी श्रद्धांजली आहे, ज्यामुळे चाहत्यांना ऑटोमोटिव्ह इतिहासाचा भाग बनण्याची अनोखी संधी मिळते.”