Citroen C3 Aircross SUV Teased: तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन ७-सीटर कार खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात एक नवीन SUV लाँच होणार आहे. फ्रेंच कार निर्माता सिट्रोएन आपली पुढील मेड-इन-इंडिया SUV आणणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, त्याचे नाव ‘Citroen C3 Aircross’ असेल. कंपनी प्रथम ते भारतात लॉन्च करेल, त्यानंतर ते जागतिक बाजारपेठेत आणले जाईल. Citroen आधीच युरोपसह इतर अनेक बाजारपेठांमध्ये त्याच नावाचा क्रॉसओव्हर विकतो. नवीन C3 एअरक्रॉस सुमारे ४.२ मीटर लांब असेल आणि SUV सारखी डिझाइन असेल. या नवीन ७-सीटर कारमध्ये ग्राहकांना लेटेस्ट फीचर्ससह उत्तम मायलेज आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्स देखील मिळणार आहे. 

लीक झालेल्या प्रतिमा आणि कंपनीचे टीझर्स सूचित करतात की, काही डिझाइन घटक Citroen C3 मधून घेतले जातील. यात स्प्लिट हेडलाइट सेट-अप, ग्रिल आणि रॅपराऊंड टेल-लॅम्प दिले जातील. आतील काही स्विचगियर C3 सारखे असतील. पहिल्या लीक झालेल्या प्रतिमांमध्ये डॅशबोर्ड, इन्फोटेनमेंट स्क्रीन, सीट्स आणि इतर घटक वेगळे पाहिले जाऊ शकतात. यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, 4 स्पीकर, पॉवर विंडो, ऑटो एसी आणि बरेच काही असलेली १०.२-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळण्याची अपेक्षा आहे. SUV तीन रो लेआउट मध्ये येईल. यात ७ लोक बसू शकतात.

bigg boss marathi varsha nikki fight gas connection off
Video : ‘बिग बॉस’च्या घरात गॅस वापरावर निर्बंध, सगळ्यांचा उडणार गोंधळ! तर, ‘या’ गोष्टीमुळे वर्षा-निक्कीमध्ये होणार वाद
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Hotel Guests leave Behind the Most Unusual and unexpected Items
प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये लोक कोणत्या वस्तू सर्वात जास्त विसरतात?
Fan came inside the stadium to meet Babar Azam
बाबर आझमला भेटायला आला चाहता, हारिस रौफने पाहिलं आणि…. VIDEO व्हायरल
R. G. Chandramogan hatsun agro products arun icecream owner net worth house and success story from selling icecreams to becoming a billionaire
एकेकाळी हातगाडीवर विकायचे आईस्क्रीम अन् आता आहेत अब्जावधींचे मालक; वाचा एकविशीत कंपनी सुरू करणाऱ्या आर. जी. चंद्रमोगन यांची यशोगाथा
history of women’s wrestling in India
Women’s Wrestling: रक्त, घाम आणि अश्रूंचा प्रवास! महिला कुस्तीपटूंची ३ दशकांची संघर्षगाथा
Cisf Recruitment 2024 Vacancy At Central Industrial Security Force For Constable Fireman
CISF Recruitment: ‘सीआयएसएफ’मध्ये नोकरी करण्याची थेट संधी; १ हजार १३० पदांसाठी भरती, दर महिना मिळणार ६५ हजार पगार
china unemployment
वाढत्या बेरोजगारीने तरुणाई काळजीत; चीनमधील बेरोजगारीमुळे सुरू झालेला ‘रॉटन टेल किड्स’ ट्रेंड नक्की आहे तरी काय?

(हे ही वाचा : मारुती करणार मोठा धमाका! बाजारात आणतेय ‘या’ दोन नव्या Hybrid कार, 40kmpl चं मायलेज अन् किंमत फक्त… )

इंजिन आणि पॉवर

१.२-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन Citroen C3 Aircross मध्ये दिले जाऊ शकते, जे C3 वरून घेतले जाईल. हे इंजिन ११०hp आणि १९०Nm पॉवर जनरेट करते. हे इंजिन C3 एअरक्रॉसमध्ये कोणत्या गिअरबॉक्स पर्यायांसह येईल, हे देखील पाहणे बाकी आहे. एक इलेक्ट्रिक पॉवरट्रेन पर्याय देखील असेल, जो काही वेळाने लाइन-अपमध्ये सामील होईल.

कधी होणार लाँच?

फ्रेंच कार निर्माता सिट्रोएन आपली पुढील मेड-इन-इंडिया SUV २७ एप्रिल रोजी आणणार आहे. या वर्षाच्या अखेरीस त्याची विक्री सुरू होण्याची अपेक्षा आहे. नवीन Citroen C3 Aircross SUV विभागातील Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara, Toyota Hyryder आणि इतर मध्यम आकाराच्या SUV ला टक्कर देईल.