Citroen C3 Launched : भारतीय बाजारपेठेत Citroen मधील सर्वात परवडणारी C3 हॅचबॅक ग्राहकांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. आता सिट्रोएन फ्रेंच कार निर्माता कंपनीने ऑगस्ट २०२४ ध्ये ‘SUV-coupe Basalt’ च्या लॉन्च इव्हेंटमध्ये Citroen C3 हॅचबॅक भारतीय बाजारपेठेत सादर केल्या आहेत. सिट्रोएनने ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मॉडेलची किंमत जाहीर केली आहे. याबरोबरच कारमध्ये सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच या फॅमिली एसयूव्हीची किंमत ९.३० लाखांपासून सुरू होईल ते १०.२७ लाखांपर्यंत असणार आहे.

इंजिन :

सिट्रोएन सी ३ ऑटोमॅटिक (Citroen C3 automatic) फक्त टॉप व्हेरियंट शाइनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये चार व्हेरियंट आहेत, ज्यात एक डुअल-टोन पर्याय आहे. सिट्रोएनने १.२ लिटर टर्बो पेट्रोलसाठी सहा स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्वर्टर देण्याचा निर्णय घेतला आहे. या इंजिनाची क्षमता १०८ bhp आहे (५५०० rpm वर) आणि २०५ Nm टॉर्क आहे (१७५० – २००० rpm दरम्यान), जे मॅन्युअल व्हेरियंटच्या तुलनेत १५ Nm जास्त आहे. ऑटोमॅटिकची किंमत मॅन्युअल ट्रान्समिशनपेक्षा ८५,००० रुपयांनी जास्त आहे.

Samsung Fab Grab Fest sales information in marathi
Fab Grab Fest : स्मार्टफोन्सवर ५३ टक्के सूट; तर फ्रिजवर मायक्रोवेव्ह मोफत; वाचा सॅमसंगच्या सेलमध्ये आणखीन काय असणार ऑफर्स
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Tata nexon cng launched
टाटाचा नाद करायचा नाय! नव्या अवतारात लॉन्च झाली ही सीएनजी कार, पॉवरफुल इंजिन अन् मायलेजसह किंमतही कमी
Sebi approves Hyundai and Swiggy IPOs print eco news
‘सेबी’कडून ह्युंदाई आणि स्विगीच्या महाकाय आयपीओंना मंजुरी; दोन्ही कंपन्यांकडून ३५,००० कोटींची निधी उभारणी अपेक्षित
Sensex hits two century high
‘फेड’च्या व्याजदर कपातीनंतर निर्देशांकांची उच्चांकी मुसंडी, सेन्सेक्सची दोन शतकी उसळी
Hyundai Venue Adventure Edition launch
Hyundai : शार्क-फिन अँटेना, डॅशकॅमसह बरीच फीचर्स; मार्केटमध्ये येतेय नवी SUV; किंमत फक्त…
Kia Carnival Booking Open 16 September Launching On Oct 3 know features
Kia Carnival: किया कार्निवलचे बुकिंग सुरु; मिळणार दमदार फीचर्स, जाणून घ्या काय असेल किंमत
now even Apple is using AI
विश्लेषण : ॲपलचीही आता एआयवर भिस्त… पण या शर्यतीत उशीर झाला का?

हेही वाचा…Yamaha च्या मोटारसायकल, स्कूटरवर हजारो रुपयांची सूट; ‘या’ दोन मॉडेल्सवर होईल मोठी बचत; वाचा काय आहे ऑफर

सिट्रोएन सी ३ व्हेरिएंट 🙁Citroen C3 )

सिट्रोएन सी३ व्हेरिएंटमॅन्युअलऑटोमॅटिक
टर्बो शाइन १० लाख रुपये
टर्बो शाइन वाइब पॅक १०.१२ लाख रुपये
टर्बो शाइन ड्युअल-टोन ९.३० लाख रुपये १०.१५ लाख रुपये
टर्बो शाइन ड्युअल-टोन वाइब पॅक९.४२ लाख रुपये१०.२७ लाख रुपये

फीचर्स :

सिट्रोएनने (Citroen C3) शाइन ऑटोमॅटिकमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. यामध्ये एलईडी हेडलाइट्स, बाहेरील रीअरव्ह्यू मिरर (ORVM) वर टर्न इंडिकेटर, रियर स्किड प्लेट, १५ इंच अलॉय व्हिल्स, फ्रंट फॉग लँप्स, इलेक्ट्रिक व फोल्डेबल ओआरव्हीएम, मागील विंडशील्डवर वॉशरसह वायपर आदींचा समावेश आहे. कारच्या कॅबिनमध्ये १०.२ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे, ज्यामध्ये Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट करेल. यामध्ये चार स्पीकर म्युझिक सिस्टीम, लेदरच्या आवरणाचा स्टीयरिंग व्हील, गियर नॉब (gear knob,) सात इंच डिजिटल TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिन सुरू/स्टॉप करण्यासाठी बटण असणार आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी या गाडीमध्ये सहा एयरबॅग्स, हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि सेन्सर्ससह मागील पार्किंग कॅमेरा आदी फीचर्स देण्यात आले आहे.

कारमध्ये रंग पर्याय :

मोनो टोन : स्टील ग्रे, जेस्टी ऑरेंज आणि प्लॅटिनम ग्रे
ड्युअल टोन : स्टील ग्रे (झेस्टी ऑरेंज), स्टील ग्रे (प्लॅटिनम ग्रे), झेस्टी ऑरेंज (प्लॅटिनम ग्रे), प्लॅटिनम ग्रे (झेस्टी ऑरेंज), पोलर व्हाइट (झेस्टी ऑरेंज) आणि पोलर व्हाइट (प्लॅटिनम ग्रे) आदी रंग पर्याय दिले जातील.