CITROEN ec3 will launch in 2023 : वाढलेल्या इंधन दरामुळे देशातील लोकांचा कल आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात टाटा, ह्युंडाई, किआ आणि इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार्स उपलब्ध आहेत. आणखी एक कार कंपनी आपली इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करणार आहे. citroen ही कार कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक कार जाणेवरीमध्ये सादर करणार आहे. ec3 असे या कारचे नाव असून ती c3 हॅचबॅकवर आधारित आहे. कंपनीने कारचा टीझर रिलीज केला असून ती पुढील वर्षी म्हणजे २०२३ साली फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला लाँच होणार आहे.
citroen ec3 ही अलीकडेच भारतीय रस्त्यांवर चाचणीदरम्यान दिसून आली आहे. कारच्या पुढील फेंडरवर कॅमोफ्लाज लावण्यात आले होते. ते चार्जिंग पोर्ट झाकत असल्याचे समजते. हे वाहन ICE C3 वर आधारीत असेल कारण साइड प्रोफाइल आणि डिजाईन हे आयसीई सारखे दिसते. मात्र, कार नियमित मॉडेलपेक्षा वेगळी दिसावी यासाठी कंपनी काही कॉस्मेटिक बदल करू शकते.
(प्रवाशी सुरक्षेसाठी केंद्र सरकारचे पाऊल, १५ वर्षांच्या वाहनांबाबत घेतला मोठा निर्णय)
कारची बॅटरी
कारच्या बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास, कार विविध बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध होऊ शकते. पर्यायांमधून ५० किलोवॉट हवर बॅटरी पॅक ज्याची रेंज ३५० किमी असल्याचा दावा केला जातो आणि जो Peugeot e 208 या वाहनाला देण्यात आला आहे, याचाही समावेश आहे.
ईव्ही कारमध्ये १३६ बीएचपीची शक्ती आणि २६० एनएमचा टॉर्क निर्माण करणारी इलेक्ट्रिक मोटर असण्याची शक्यता आहे. ईव्हीमध्ये ३०० किमीची रेंज देणारे छोटे बॅटरी पॅक मिळण्याची देखील शक्यता आहे.
(सुरक्षा चाचणीत कमकुवत ठरल्या ‘या’ ३ CAR, मिळाले केवळ 1 STAR RATING, खरेदीपूर्वी पाहा लिस्ट)
फीचर्स
सध्याच्या ICE C3 मध्ये क्रुझ कंट्रोल, रिअर वायपर्स, रिअर डिफॉगर, ओआयव्हीएमसाठी मॅन्युअल अॅडजेस्टमेंट आणि इतर मूलभूत फीचर्स नाहीत. हे फीचर इलेक्ट्रिक वाहनामध्ये मिळू शकते. कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्लेसह १० इंचचा टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, हाइट अॅडजस्टेबल ड्राइव्हर सीट, चार स्पिकर्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टिअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स मिळण्याची शक्यता आहे.
लाच झाल्यावर सिट्रिऑनची इलेक्ट्रिक कार टाटा टिआगो ईव्ही आणि टिगोर ईव्हीला टक्कर देईल. या कारची किंमत १० लाखांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.