Citroen India ने Citroen C3 Aircross SUV ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लाँच केली आहे. C3 Aircross Automatic ला Plus, Max आणि Maxx (५+२ आसनं) सह अशा तीन व्हेरिएंटमध्ये आणले आहे. Citroen C3 Aircross Automatic ने भारतात मध्यम आकाराच्या एसयूव्हीच्या सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. येत्या काळात ऑटोमॅटिक कारची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालवायला सोपी असलेल्या ऑटोमॅटिक कार विकत घ्यायचा विचार करत असाल तर ही कार तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कारमध्ये काय आहे खास?

Citroen C3 Aircross ऑटोमॅटिक व्हेरिएंट देखील त्याच 1.2L, 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह येतो, जो त्याच्या मॅन्युअल प्रकारात देखील उपलब्ध आहे. ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले, हे इंजिन १०९bhp पॉवर आणि २०५Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय C3 एअरक्रॉसच्या डिझाइन आणि इंटीरियरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मॅन्युअल प्लस ट्रिम प्रमाणेच, ऑटोमॅटिक C3 एअरक्रॉसला वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह १०.२-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ४ स्पीकर, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, कनेक्टेड कार टेक, फ्रंट आणि रिअर यूएसबी चार्जर, ॲडजस्टेबल हेडरेस्ट आणि LED DRLs आहेत. आवश्यक ड्रायव्हिंग माहिती  देणारा सात इंचाचा टीएफटी क्लस्टर देण्यात आला आहे.

(हे ही वाचा : Ertiga ला तगडं आव्हान देणाऱ्या ‘या’ ८ सीटर MPV कारला ग्राहकांची मोठी मागणी, वेटिंग पीरियड पोहोचला ७ महिन्यांवर )

मॅक्स ट्रिम्स काही विशेष फिटमेंट्ससह येतात, ज्यात फ्रंट फॉग लॅम्प, शार्क फिन अँटेना, रीअरव्ह्यू कॅमेरा, वॉशरसह मागील वायपर, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील, १७-इंच डायमंड-कट अलॉय व्हील आणि दोन ट्वीटरसह ४ स्पीकर आहेत. यूएसबी चार्जिंग सॉकेट, डायनॅमिक guidelines, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रूफ रेल, रिमोट इंजिन स्टार्ट, रियर वायपर आणि बरेच काही यासारखे अॅडव्हान्स फिचर्स आहेत. Citroen C3 Aircross Automatic ही कार बाजारपेठेत ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा या कारला टक्कर देण्याची शक्यता आहे.

किंमत

या कारच्या प्लस एटी व्हेरियंटची किंमत १२.८५ लाख रुपये आहे, मॅक्स ५-सीटर एटी व्हेरियंटची किंमत १३.५० लाख रुपये आहे आणि मॅक्स ७-सीटर एटी व्हेरिएंटची किंमत १३.८५ लाख रुपये आहे. या किमती एक्स-शोरूम आहेत. या नवीन ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी बुकिंग सुरू झाले आहे. तुम्ही या कारची बुकिंग २५ हजार रुपयांत करु शकता.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citroen launches c3 aircross at the most budget friendly automatic midsize suv in india pdb