Cars Attracts Discount of up to Rs 2 Lakh: या महिन्यात जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे, कारण तुमच्या आवडीची कार घेण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. या महिन्यात तुम्हाला एका जबरदस्त कारवर भारी डिस्काउंट ऑफर (Discount Offer) उपलब्ध आहेत. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही पैशांची बचत करू शकता. जाणून घ्या कोणती आहेत ही कार?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ कारवर मिळतेय २ लाखांची सूट

फ्रान्सची कार निर्माता कंपनी Citroen ची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. कारण, कंपनी Citron C3, Citron C5 Aircross वर तब्बल २ लाख रुपये अधिक सूट देत आहे. या दोन्ही वाहनांवर काय ऑफर उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया.

(हे ही वाचा : रतन टाटा करणार सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण! Alto पेक्षाही स्वस्त आणताहेत ‘ही’ Mini SUV )

Citroen C5 Aircross SUV पूर्णपणे लोड केलेल्या शाइन प्रकारात येते, ज्याची किंमत ३७.१७ लाख (एक्स-शोरूम) आहे. वाहनावर २ लाख रुपयांचे निश्चित फायदे असले तरी, ऑफर फक्त २०२२ मध्ये उत्पादित C5 वर लागू आहेत.

Citroen C3 लाइव्ह, फील, फील टर्बो व्हेरियंटसह एकूण 3३प्रकारांमध्ये येते. Live ची किंमत ५.९८ लाख (एक्स-शोरूम), फीलची किंमत ७.२० लाख (एक्स-शोरूम) आणि फील टर्बोची किंमत ८.२५ लाख (एक्स-शोरूम) आहे. C3 ने ५०,००० रुपयांचे फायदे आणि १०० टक्के ऑन-रोड फंडिंगचे आश्वासन दिले आहे. Citroen C5 Aircross SUV आणि Citroen C3 वरील ऑफर फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंत वैध आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citroen which sells the c5 aircross suv and the c3 is offering benefits and discounts up to rs 2 lakh on the two models pdb