Jaguar F-Pace Fire: गाडीमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना ऐकायला, पाहायला मिळतात. यात बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसल्याने, गाडी लॉक झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याचं देखील समोर आलं आहे. आता नुकतेच दिल्ली-जयपूर महामार्गावर चालत्या Jaguar F-Pace लक्झरी एसयूव्हीला आग लागली असल्याची घटना समोर आली आहे. जळत्या लक्झरी एसयूव्हीचा व्हिडिओही समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, काळ्या रंगाची जग्वार एफ-पेस एसयूव्ही पूर्णपणे आगीत जळून खाक झालेली दिसत आहे. हा अपघात झाला तेव्हा वाहन वेगात असल्याची माहिती आहे. सुदैवाने कार चालकाला कोणतीही दुखापत न होता गाडीतून बाहेर पडण्यात यश आले. वृत्तानुसार, हरियाणातील मानेसरजवळ हा अपघात झाला आहे.

(हे ही वाचा : ५.९९ लाखाच्या ६ एअरबॅग्सवाल्या सर्वात लहान SUV ची देशभरात छप्परफाड विक्री; वेटिंग पीरियड पोहोचला ‘इतक्या’ महिन्यांवर )

हा व्यक्ती आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मानेसर येथे गेला होता. मानेसरहून गुरुग्रामला परतत असताना दिल्ली-जयपूर महामार्गावर जग्वार एफ-पेस एसयूव्हीला आग लागली. कारला आग लागल्यावर चालकाने गाडी थांबवली आणि सुखरूप बाहेर आले. या आठवड्यात मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान एका लक्झरी एसयूव्हीला आग लागल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मानेसर पोलिस स्टेशनचे एसएचओ म्हणाले, “IMT मानेसरजवळ सुमारे १ कोटी रुपयांच्या कारला आग लागली. कारचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.”

आगीची माहिती मानेसर येथील अग्निशमन विभागाला देण्यात आली मात्र ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. प्राथमिक माहितीनुसार, आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांचा अहवाल काही वेगळच सांगतो. कारमधून पेट्रोल लिक झाल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.