CM Eknath Shinde Launches E-Shivneri Bus: महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या ई-शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने मुंबई ठाणे दरम्यान इंटरसिटी इलेक्ट्रिक बसेस प्रवासी सेवेत आणल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग मंडळाच्या ताफ्यात ई-शिवनेरी बस दाखल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक आरामदायी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएसआरटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली ई-शिवनेरी बस मुंबई-ठाणे- पुणे या मार्गावर धावणार आहे. ऑलेक्ट्रा ग्रिनटेकने ही इलेक्ट्रिक उर्जेवर धावणारी , आवाजरहित, प्रदूषणरहित इंटरसिटी ई-शिवनेरी बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (MSRTC) महामंडळाला सुपुर्द केली आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 2 May: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

ई-शिवनेरी बसची वैशिष्ट्ये

नव्याने दाखल झालेल्या ई-शिवनेरी बसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये ABS सह डिस्क ब्रेक, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, रिअल टाइम ट्रॅकिंग सिस्टिम, सामानासाठी जागा, युएसबी कनेक्शनसह , सीट बेल्ट असलेली पुश बॅक सीट आणि Advance वाहन व्यवस्थापन प्रणाली असे फीचर्स या बसमध्ये मिळणार आहेत.

हेही वाचा : …म्हणूनच तुमची कार चांगल मायलेज देत नाही, फक्त करा ‘हे’ काम, पेट्रोल वरील खर्चात होईल कपात

एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षा ई-शिवनेरी बसच्या लोकार्पणाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटी देखील अमृतमहोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde inauguration e shivneri bus mumbai pune thane 100 buses msrtc service for passengers tmb 01
Show comments