Top 10 CNG Cars Under Budget: दिवाळीत जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल, तर तुमची मोठी बचत होईल. कार खरेदी करताना पैसे कसे वाचवायचे हे ऐकून तुम्हाला थोडेसे विचित्र वाटेल; पण पेट्रोल-डिझेलऐवजी तुम्ही स्वत:साठी सीएनजी, इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड कार खरेदी करता तेव्हा ही गोष्ट खरी होऊ शकते. मात्र, आता तुम्ही असेही म्हणाल की, या गाड्या जास्त महाग असतात. पण काही सीएनजी कार्स अशा आहेत की, ज्या पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा जास्त महाग नाहीत आणि त्यांची रनिंग कॉस्टदेखील कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. मारुति सुजुकी ब्रेजा सीएनजी

देशातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारुती सुझुकी ब्रेझाच्या सीएनजी प्रकाराची एक्स-शोरूम किंमत ९.२९ लाख ते १२.२६ लाख रुपये आहे.

२. मारुति सुजुकी अर्टिगा सीएनजी

गेल्या सप्टेंबरमध्ये देशात सर्वाधिक विक्री झालेल्या मारुति सुजुकी अर्टिगाच्या सीएनजी व्हेरियंटची विक्रीही खूप झाली होती. मारुति अर्टिगा सीएनजीची एक्स शोरूम किंमत १०.७८ लाख रुपयांपासून सुरू होऊन ११. ८८ लाख रुपयांपर्यंत जाते.

३. टाटा नेक्सॉन सीएनजी

टाटा मोटर्सने गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या स्टायलिश एसयुव्ही नेक्सॉनचे सीएनजी व्हेरियंट लाँच केले. टाटा नेक्सॉन सीएनजी एक्स-शोरूम किंमत ८.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १४.५९ लाख रुपयांपर्यंत जाते.

४. मारुती सुझुकी बलेनो सीएनजी

मारुती सुझुकीच्या प्रीमियम हॅचबॅक बलेनोच्या सीएनजी व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ८.४० लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.३३ लाख रुपयांपर्यंत जाते.

हेही वाचा… चर्चा तर होणारच! ‘या’ स्वस्त एसयूव्हीवर अख्खा देश फिदा, एअरबॅग्जसह आहेत ‘हे’ दमदार सेफ्टी फिचर्स

५. मारुती सुजुकी फ्रॉन्क्स सीएनजी

मारुती सुझुकी फ्रंट सीएनजीची एक्स-शोरूम किंमत ८.४६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.३२ लाख रुपयांपर्यंत जाते.

६. मारुती स्विफ्ट सीएनजी

मारुती सुझुकी स्विफ्ट या देशातील सर्वाधिक विकली जाणाऱ्या हॅचबॅक कारचे, ३ सीएनजी प्रकार आहेत आणि त्यांची एक्स-शोरूम किंमत ८.२० लाख ते ९.२० लाख रुपये आहे.

७. टाटा पंच सीएनजी

टाटा मोटर्सची सर्वाधिक विक्री होणाऱ्या पंचचे सीएनजी व्हेरियंटगी चांगले विकले जातात. टाटा पंच सीएनजीची एक्स-शोरूम किंमत ७.२३ लाख ते १०.०५ लाख रुपये आहे.

८. टोयोटा अर्बन क्रूजर टाइजर सीएनजी

टोयोटाच्या लोकप्रिय क्रॉसओवर अर्बन क्रूझर टायगरची एक्स-शोरूम किंमत ८.७१ लाख रुपये आहे.

हेही वाचा… मारुतीसमोर क्रेटा फेल, ‘या’ एसयूव्हीचं लिमिटेड एडिशन झालं लॉंच, दिवाळीत करणार मार्केट जाम

९. ह्युंदाई एक्सेटर सीएनजी

ह्युंदाई मोटर इंडियाची सर्वात स्वस्त एसयूव्ही एक्सटरच्या व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ८.४३ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.३८ लाख रुपयांपर्यंत जाते.

१०. मारुती सुजुकी सिलेरियो सीएनजी

देशातील सर्वाधिक मायलेज देणारी सीएनजी कार, मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजीची किंमत ६.७४ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cng car in budget diwali offer top 10 cng cars of maruti suzuki tata hyundai dvr