पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सीएनजी कारला लोकं पसंती देत आहेत. इलेक्ट्रिकच्या तुलनेत कमी किंमतीत परवडणारी, दमदार मायलेज देणारी सीएनजी कार घेण्याकडे लोकांचा जास्त कल आहे. तुम्ही सीएनजी कार किंवा स्टायलिश कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टाटा, टोयोटाच्या सीएनजी गाड्या जानेवारी २०२२ मध्ये लॉन्च होणार आहेत. चला जाणून घेऊया या गाड्यांबद्दल
टाटा टियागो आणि टिगॉर
टाटा जानेवारी २०२२ च्या अखेरीस टियागो आणि टिगॉर फॅक्टरी-फिटेड सीएनजी गाड्या लॉन्च करणार आहे. दोन्ही गाड्या १.२ लिटर पेट्रोल इंजिनसह असतील. परंतु सीएनजीवर स्विच केल्यास आउटपुट किंचित कमी होण्याची शक्यता आहे. सीएनजी पर्याय फक्त खालच्या वेरिएंटसह ऑफर केला जाईल. टियागोचे प्रतिस्पर्धी असलेले मारुती वेगनआर आणि ह्युंदइ सँट्रो सीएनजी पर्यायासह येतात.
टाटा अल्ट्रोज
जानेवारी २०२२ अल्ट्रोजसह प्रीमियम हॅचबॅक स्पेसमध्ये दोन वर्षे पूर्ण करणार आहे. कंपनी या संधीचा फायदा घेत कंपनी DCT (ड्युअल-क्लच ट्रान्समिशन) सह स्वयंचलित प्रकार सादर करण्याची शक्यता आहे. पहिल्या वर्धापनदिनानिमित्त हॅचबॅकचे टर्बो-पेट्रोल प्रकार सादर केला होता.
टोयोटा हिलक्स
टोयोटा इसुजु डी मॅक्स व्ही क्रॉसशी स्पर्धा करण्यासाठी हिलक्स गाडी आणली जात आहे. या गाडीच्या संभाव्य किंमतीबद्दल बोलायचे तर,२० लाख रुपयांपर्यंत येऊ शकते. सध्या कंपनीची इसुजु डी मॅक्सशी व्ही क्रॉस ही भारतातील एकमेव लाइफस्टाइल पिकअप आहे. त्यामुळेच टोयोटा या विभागाकडे लक्ष देत असून हिलक्ससह येत आहे. हिलक्स आणि हिलक्स रेवो या दोन प्रकारांमध्ये ही कार येण्याची अपेक्षा आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह सादर केली जाईल.
फेसलिफ्टेड ऑडी क्यू 7
ऑडीची चर्चा त्याच्या किंमतीमुळे असते. या गाडीची किंमत ७५ लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे. मर्सिडीज बेंज जीएलई, बीएमडब्ल्यू एक्स 5, वोल्वो एक्ससी 90 आणि लँडरोव्हर डिस्कव्हरीशी स्पर्धा असेल. ऑडी आपल्या फेसलिफ्टेड क्यू 7 या गाडीचं जानेवारीत लॉन्चिंग करणार आहे. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये येऊ शकते. लक्झरी तीन पंक्ति एसयूव्हीत ३ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल.