Top 3 CNG Cars In India Under 10 Lakhs: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आता देशात CNG कारची मागणी खूप वाढली आहे. सीएनजी कार चांगला पर्याय ठरू शकते. कार कंपन्यांनीही आता अधिकाधिक सीएनजी कार बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही जर सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला १० लाखांच्या आत मिळणाऱ्या सीएनजी कारबाबत सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला कार घेणे सोपे जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१० लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ आलिशान सीएनजी कार

Maruti Suzuki Fronx CNG

मारुतीने या वर्षी एप्रिलमध्ये देशांतर्गत बाजारात आपली Franx SUV सादर केली होती. ज्याची सुरुवातीची किंमत ७.४६ लाख रुपये एक्स-शोरूम आहे. कंपनीने या एसयूव्हीचे दोन प्रकार, सिग्मा आणि डेल्टा, सीएनजीसह सुसज्ज केले आहेत, ज्याची किंमत ८.४२ लाख रुपये आणि एक्स-शोरूम रुपये ९.२८ लाख आहे. त्याचे ARAI प्रमाणित मायलेज २८.५१ किमी/किलो पर्यंत आहे.

(हे ही वाचा : देशातल्या सर्वात सुरक्षित टॉप ५ कार्समध्ये Tata ची एकही कार नाही, कारण काय…? )

Hyundai Exter S CNG

Hyundai Motor ने नुकतीच आपली micro SUV Xeter लाँच केली आहे. ज्याची सुरुवातीची किंमत ५.९९ लाख रुपये एक्स-शोरूम आहे. कंपनीने त्याचे S आणि SX प्रकार CNG पर्यायासह सादर केले आहेत, ज्याची किंमत ८.२४ लाख रुपये आणि एक्स-शोरूम ८.९७ लाख रुपये आहे. Hyundai या कारसाठी २७.१ km/kg पर्यंत मायलेजचा दावा करते.

Maruti Suzuki Brezza CNG

मारुती सुझुकीने मार्च २०२३ मध्ये CNG पर्यायासह ब्रेझा सादर केला. ज्याची सुरुवातीची किंमत ९.२४ लाख रुपये आहे, जी एक्स-शोरूम १२.१५ लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती सुझुकीने या कारसाठी २५.५१ किमी/किलोपर्यंत मायलेजचा दावा केला आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cng cars with best mileage under 10 lakh are maruti suzuki maruti suzukifronxcng and two other pdb