महिंद्राने सुमारे एक दशकापूर्वी त्याकाळातील अगदी नव्या इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये ई२० लाँच केले होते, जो महिंद्र रेवाचा नवीन अवतार होता. सर्वांत आधी या संधीचा फायदा उचलणाऱ्या महिंद्रा कंपनीला आपले इलेक्ट्रॉनिक वाहन लाइनअप पुढे नेता न आल्याने फार काळ हा लाभ घेता आला नाही. याच्या तुलनेत टाटा मोटर्स, ह्युंडाई इंडिया, तसेच एमजी मोटर इंडियाने सुद्धा या सेगमेंटमध्ये आपल्या गाड्या लॉंच केल्या आहेत. महिंद्रा कंपनीच्या गाड्यांना भारतात खूप पसंती आहे आणि एक्सयूव्ही३०० (XUV300) यापैकीच एक आहे. तथापि, आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत हीच या गाडीच्या यशाचे रहस्य असेल.
लवकरच येणार इलेक्ट्रिक एक्सयूव्ही३०० (eXUV300)
महिंद्राने नंतर बॅटरीवर चालणारी ई-वेरिटो सेडान लाँच केली ज्याला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला, सध्या महिंद्रा फक्त ही एकच इलेक्ट्रिक कार विकत आहे. आता महिंद्रा कंपनीने इलेक्ट्रॉनिक वाहन सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करण्याचे ठरवले असून लवकरच इलेक्ट्रिक एक्सयूव्ही३०० बाजारात सादर केली जाऊ शकते. या ईव्हीचे प्री-प्रॉडक्शन मॉडेल मागील ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. कंपनी २०२३ पर्यंत नवीन एक्सयूव्ही३०० इलेक्ट्रिक बाजारात आणू शकते, त्यानंतर महिंद्राच्या आणखी अनेक कार लॉंच केल्या जातील.
सामान्य कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे शक्य? जाणून घ्या किती येईल खर्च
एका फुल चार्जमध्ये मिळणार ३०० किमीपर्यंतची रेंज
नवीन ब्रँड नावाच्या अंतर्गत इतर अनेक इलेक्ट्रिक वाहने लॉंच करण्याचा महिंद्रा कंपनीचा मानस आहे. महिंद्रा एक्सयूव्ही३०० सोबत ४० किलोवॅट-आर बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता असून ती १३० बीएचपी पॉवर तसेच एका फुल चार्जमध्ये ३०० किमीपर्यंतचा रेंज देईल. नुकतंच याचा टेस्ट मॉडेल पाहण्यात आला असून बाजारात लॉंच झाल्यानंतर इलेक्ट्रिक एसयूव्हीची स्पर्धा टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक, ह्युंडाई आणि एमजीची आगामी परवडणारी इलेक्ट्रिक कार यांच्याशी होणार आहे.