नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपन्या चांगल्या ऑफर आणि डिस्काउंट देत असतात. तुम्ही जर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. १ जानेवारीपूर्वी कार घेऊन तुम्ही तब्बल अडीच लाखांपर्यंत डिस्काउंट मिळवू शकता. मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर आणि टाटा मोटर्ससह देशातील सर्व मोठ्या कार कंपन्या वाहनांवर लाखो रुपयांची सूट देत आहेत. या कार अगदी सवलतीच्या किंमतीवर तुम्ही खरेदी करू शकता. या कार कंपन्या कॅश डिस्काउंटसोबत एक्सचेंज बोनस देखील देत आहेत.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी ३७ हजार ते ८९ हजारांपर्यंत सूट देत आहे. तर टाटा मोटर्स ७७,५०० ते २.२५ लाखांपर्यंत सूट देत आहे. टाटाच्या हॅचबॅक वाहनांवर ७७,५०० आणि Hexa वर सव्वादोन लाखांची सूट मिळेल. होंडा तर आपल्या वाहनांवर तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. दरम्यान, नुकत्याच लाँच झालेल्या लक्झरी सिडान कार Honda Civic वर कंपनी २.५५ लाख रुपयांपर्यंतचे लाभ देत आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की या कार इतक्या डिस्काउंटवर का विकल्या जात आहेत. तर याचं कारण म्हणजे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी, सर्व कार कंपन्यांना त्यांचा जुना स्टॉक विकायचा असतो. त्यामुळे डीलर्स गाड्यांवर लाखो रुपयांची सूट देतात. सवलतींसोबतच ते अॅक्सेसरीज ऑफर, एक्सचेंज ऑफर्स देखील देतात. याचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे वर्ष बदललं की गाड्यांचं मॉडेल जुनं होतं. म्हणजे २०२१मध्ये बनवलेली कार ही २०२२ मध्ये जुनी होते. त्यामुळे ग्राहक ती खरेदी करत नाहीत.
तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही ऑफर्ससह अगदी सवलतीच्या किमतीत ती खरेदी करू शकता. कारण जानेवारीमध्ये कार महाग होणार आहेत. नवीन वर्षात कार कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहेत. त्यामुळे कार घ्यायची असेल त्यांच्यासाठी हा महिना अगदी योग्य आहे.