विविध कार उत्पादक कंपन्यानी फेब्रुवारी २०२२ या महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या घाऊक विक्रीत फेब्रुवारीमध्ये किरकोळ घट दिसून आली आहे. महिंद्राच्या एकूण विक्रीत ८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. होंडा कारची घाऊक विक्री फेब्रुवारीमध्ये २३ टक्क्यांनी घसरली आहे. अशोक लेलँडच्या एकूण विक्रीत फेब्रुवारीमध्ये ७ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. ह्युंदाईच्या एकूण विक्री फेब्रुवारीमध्ये १४ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर फेब्रुवारीमध्ये टाटा मोटर्सच्या देशांतर्गत विक्रीत २७ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. टोयोटा किर्लोस्करची घाऊक विक्री फेब्रुवारीमध्ये ३८ टक्क्यांनी घसरून ८,७४५ युनिट्सवर आली आहे. कंपनीने फेब्रुवारी २०२१ मध्ये देशांतर्गत बाजारपेठेतील डीलर्सना १४,०७५ युनिट्स पाठवले होते. निसान इंडियाची एकूण घाऊक विक्री फेब्रुवारीमध्ये ५७ टक्क्यांनी वाढून ६,६६२ युनिट्सवर गेली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात २,४५६ युनिट्सची विक्री केली आणि ४,२०६ युनिट्सची निर्यात केली. गेल्या वर्षी याच महिन्यात ४,२४४ मोटारींची घाऊक विक्री केली होती. स्कोडा ऑटोची विक्री फेब्रुवारीमध्ये पाच पटीने वाढून ४,५०३ युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने ८५३ मोटारींची विक्री केली होती. MG मोटर इंडियाने सांगितले की त्यांची किरकोळ विक्री फेब्रुवारी २०२२ मध्ये ४,५२८ युनिट्स झाली असून वार्षिक विक्री पाच टक्क्यांनी वाढली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये ४,३२९ युनिट्स होती.

  • टाटा मोटर्स: टाटा मोटर्सच्या गाड्यांची देशांतर्गत विक्री फेब्रुवारीमध्ये २७ टक्क्यांनी वाढून ७३,८७५ युनिट्स झाली आहे. कंपनीने फेब्रुवारी २०२१ मध्ये डीलर्सना ५८,३६६ युनिट्स पाठवले. ऑटो कंपनीने सांगितले की, गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात तिची प्रवासी वाहनांची विक्री ४७ टक्क्यांनी वाढून ३९,९८१ युनिट्स झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात २७,२२५ युनिट्स होती.
  • मारुती सुझुकी: फेब्रुवारीमध्ये मारुती सुझुकीची घाऊक विक्री किरकोळ घटून १,६४,०५६ युनिट्सवर आली. मारुती सुझुकीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांनी १,६४,४६९ वाहनांची विक्री केली होती. गेल्या महिन्यात कंपनीची देशांतर्गत विक्री ८.४६ टक्क्यांनी घसरून १,४०,०३५ युनिट्सवर आली. एक वर्षापूर्वी फेब्रुवारी २०२१ मध्ये १,५२,९८३ युनिट होते.
  • महिंद्रा अँड महिंद्रा: फेब्रुवारीमध्ये त्यांची एकूण विक्री ८९ टक्क्यांनी वाढून ५४,४५५ युनिट्स झाली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये कंपनीची एकूण विक्री २८,७७७ युनिट्स होती. एका निवेदनात कंपनीने सांगितले की, प्रवासी वाहनांची विक्री गेल्या महिन्यात ८० टक्क्यांनी वाढून २७,६६३ युनिट्सवर गेली आहे, जी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये १५,३९१ युनिट्स होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये ११,५५९ युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात व्यावसायिक वाहनांची विक्री २३,९७८ युनिट्सपर्यंत वाढली. गेल्या महिन्यात त्यांची निर्यात २,८१४ युनिट्स होती, जी गेल्या वर्षी याच महिन्यात १,८२७ युनिट्स होती.
  • होंडा: ऑटोमोबाईल निर्माता कंपनी होंडा कार्स इंडियाची देशांतर्गत बाजारपेठेतील घाऊक विक्री फेब्रुवारी २०२२ मध्ये २३ टक्क्यांनी घसरून ७,१८७ युनिट झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने ९,३२४ मोटारींची विक्री केली होती. त्याच वेळी, कंपनीची निर्यात गेल्या महिन्यात २,३३७ युनिट्सपर्यंत वाढली होती, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ९८७ युनिट्स होती.

Ukraine War: ऑटो कंपन्यांकडून रशियाची आर्थिक कोंडी; व्होल्वो, मर्सिडिसनंतर हार्ले-डेविडसनने घेतला कठोर निर्णय

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Image of the BSE building.
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही सुरू राहणार शेअर बाजार, ‘एनएसई’ने दिली मोठी अपडेट
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Daily petrol diesel price on 23 December
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात ‘इतक्या’ रुपयांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर! पाहा तुमच्या शहरांत काय सुरु आहे इंधनाची किंमत
Gen Beta
Gen Beta (2025-2039):आजपासून जन्माला येणार ‘Gen Beta’; पिढ्यांचे वर्गीकरण कोणी आणि का केले?
  • अशोक लेलँड: हिंदुजा समूहाची प्रमुख कंपनी अशोक लेलँडच्या व्यावसायिक वाहनांची एकूण विक्री फेब्रुवारी २०२२ मध्ये ७ टक्क्यांनी वाढून १४,६५७ युनिट्स झाली. कंपनीने फेब्रुवारी २०२१ मध्ये १३,७०३ व्यावसायिक वाहनांची विक्री केली आहे. त्याच वेळी, फेब्रुवारी २०२२ मध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री चार टक्क्यांनी वाढून १३,२८१ युनिट्सवर पोहोचली आहे. एका वर्षापूर्वी याच महिन्यात १२,७७६ युनिट्स होती. याशिवाय, गेल्या महिन्यात मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहन श्रेणीतील कंपनीची विक्री १६ टक्क्यांनी वाढून ८,२८० युनिट्सवर गेली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ७,११४ युनिट होते.
  • ह्युंदाई: ह्युंदाई मोटर इंडियाची एकूण विक्री फेब्रुवारीमध्ये १४ टक्क्यांनी कमी झाली आहे. फेब्रुवारीमध्ये एकूण विक्री वार्षिक १४ टक्क्यांनी घटून ५३,१५९ युनिट्सवर आली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी याच महिन्यात ६१,८०० युनिट्सची विक्री केली होती. देशांतर्गत विक्री वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत १४.६ टक्क्यांनी घसरून ४४,०५० युनिट्सवर आली आहे.

Story img Loader