विविध कार उत्पादक कंपन्यानी फेब्रुवारी २०२२ या महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या घाऊक विक्रीत फेब्रुवारीमध्ये किरकोळ घट दिसून आली आहे. महिंद्राच्या एकूण विक्रीत ८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. होंडा कारची घाऊक विक्री फेब्रुवारीमध्ये २३ टक्क्यांनी घसरली आहे. अशोक लेलँडच्या एकूण विक्रीत फेब्रुवारीमध्ये ७ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. ह्युंदाईच्या एकूण विक्री फेब्रुवारीमध्ये १४ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर फेब्रुवारीमध्ये टाटा मोटर्सच्या देशांतर्गत विक्रीत २७ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. टोयोटा किर्लोस्करची घाऊक विक्री फेब्रुवारीमध्ये ३८ टक्क्यांनी घसरून ८,७४५ युनिट्सवर आली आहे. कंपनीने फेब्रुवारी २०२१ मध्ये देशांतर्गत बाजारपेठेतील डीलर्सना १४,०७५ युनिट्स पाठवले होते. निसान इंडियाची एकूण घाऊक विक्री फेब्रुवारीमध्ये ५७ टक्क्यांनी वाढून ६,६६२ युनिट्सवर गेली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात २,४५६ युनिट्सची विक्री केली आणि ४,२०६ युनिट्सची निर्यात केली. गेल्या वर्षी याच महिन्यात ४,२४४ मोटारींची घाऊक विक्री केली होती. स्कोडा ऑटोची विक्री फेब्रुवारीमध्ये पाच पटीने वाढून ४,५०३ युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने ८५३ मोटारींची विक्री केली होती. MG मोटर इंडियाने सांगितले की त्यांची किरकोळ विक्री फेब्रुवारी २०२२ मध्ये ४,५२८ युनिट्स झाली असून वार्षिक विक्री पाच टक्क्यांनी वाढली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये ४,३२९ युनिट्स होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा