देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असणारी महिंद्रा कंपनीसाठी या वर्षांतील ऑगस्ट हे उत्तम वर्ष ठरले आहे. कंपनीने वार्षिक ८८ टक्के आणि मासिक वाढ ६ टक्के गाठली. या वाढीवरून हे स्पष्ट होते की लोक महिंद्राच्या एसयूव्हीला पसंती देत आहेत. परंतु आता मात्र, महिंद्राला एक मोठा झटका लागला आहे. महिंद्राची एक एसयूव्ही अशीही आहे ज्याचे एकही युनिट विकले नाही. म्हणजेच त्याची विक्री शून्य होती. इतकेच नाही तर गेल्या ५ महिन्यांपासून या कारची विक्री शून्य आहे.

‘Mahindra KUV100’ या कारचे कंपनीचे एकही युनिट विकले गेले नाही.कंपनीने अद्याप हे मॉडेल बंद केलेले नाही. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्टिंग आहे. गेल्या १२ महिन्यांत केवळ ४७ युनिट्सची विक्री झाली Mahindra KUV100 च्या विक्रीच्या आकड्यांबद्दल बोलायचे तर, गेल्या १२ महिन्यांत (सप्टेंबर ते ऑगस्ट) फक्त ४७ युनिट्सची विक्री झाली आहे.

त्यापैकी ४२ युनिट्स सप्टेंबर २०२१ मध्ये विकल्या गेल्या. यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये एक, जानेवारी २०२२ मध्ये एक, फेब्रुवारी २०२२ मध्ये एक आणि मार्च २०२२ मध्ये २ युनिट्सची विक्री झाली. याशिवाय उर्वरित महिन्यांत त्याची विक्री शून्य होती. म्हणजेच गेल्या १२ महिन्यांपैकी ७ महिने असे होते ज्यात लोकांनी एकही KUV 100 खरेदी केली नाही. KUV100 चे नवीन मॉडेल KUV100 NXT आहे.

आणखी वाचा : होंडाच्या ‘या’ नव्या दुचाकीची माहिती झाली उघड; जाणून घ्या फीचर्स…

कंपनी ७२ हजारांहून अधिक सूट देत आहे

महिंद्रा KUV100 वरही मोठी सूट देत आहे. deal4loans वेबसाइटनुसार, कंपनी तिच्या विविध व्हेरियंटवर ७२,७५० रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये रोख सवलत, अॅक्सेसरीज, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. K2 व्हेरियंटवर ५२,७५० रुपये, K4+ व्हेरिएंटवर ५८,७५० रुपये, K6 आणि K8 व्हेरिएंटवर ७२,७५० रुपयांची SUV दिली जात आहे.

Mahindra KUV100 NXT फीचर्स

SUV मध्ये १.२-लिटर BS6 पेट्रोल इंजिन आहे जे ५५००rpm वर ८२bhp आणि ३५०० आरपीएमवर ११५ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. यात ३५-लिटरची इंधन टाकी मिळते. कंपनीचा दावा आहे की ते सुमारे १८ kmpl चा मायलेज देते. यात एलईडी डीआरएलसह ड्युअल-चेंबर हेडलॅम्प, इंटिग्रेटेड टर्न सिग्नल इंडिकेटरसह बॉडी-कलर्ड ORVM, बॉडी-कलर्ड बंपर, क्रोम अॅक्सेंटसह फॉग लॅम्प, १५-इंच अलॉय व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टीयरिंग व्हील, टिल्ट फंक्शनसह ड्रायव्हर मिळतात.

आणखी वाचा : अरे वा! ‘या’ कंपन्या देत आहेत आपल्या दुचाकीवर खास फेस्टिव्ह ऑफर; जाणून घ्या एका क्लिकवर…

Mahindra KUV100 NXT किंमत

Mahindra KUV100 NXT चार व्हेरियंटमध्ये खरेदी करता येईल. त्याच्या K2+ 6 Str NXT BS6 व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ६.०२ लाख रुपये आहे, K4+ 6 Str NXT BS6 व्हेरियंटची किंमत ६.५० लाख रुपये आहे, K6+ 6 Str NXT BS6 व्हेरिएंटची किंमत आहे ७.३३ लाख रुपये आणि K8 6 Str NXT व्हेरिएंटची किंमत BS6 लाख रुपये आहे. हे एकूण ८ रंग पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. यात ६ सिंगल आणि २ ड्युअल टोन रंगांचा समावेश आहे.

Story img Loader