Electric Vehicle: सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) बाजारपेठ झपाट्याने विस्तारत आहे, त्यामुळे वाहन उत्पादक सातत्याने नवीन मॉडेल बाजारात आणत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे देखील इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. मात्र, गाड्यांच्या महागड्या किमतीमुळे मनात असूनही अनेक लोकांना ते विकत घेता येत नाही. तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईक खरेदीचा विचार करत आहात आणि तुमचा बजेट कमी असेल तर आता चिंता सोडा. कारण आज आम्ही तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या सामान्य वाहनाचे अगदी स्वस्तात इलेक्ट्रिक वाहनामध्ये कसे रुपांतर करता येईल, यावर सोप्या ट्रिक्स देणार आहोत.
‘या’ पद्धतीने करा तुमच्या सामान्य वाहनाचे इलेक्ट्रिक वाहनामध्ये रुपांतर
तुम्ही अनेक प्रकारच्या वाहनांना इलेक्ट्रिकमध्ये बदलू शकता. या प्रक्रियेत एक किट वापरला जातो आणि या किटमध्ये मोटर आणि बॅटरीचे मिश्रण असते. या किटद्वारे सर्व वाहने इलेक्ट्रिकमध्ये बदलली जातात. रेंज आणि वेगानुसार ही वाहने वेगवेगळ्या किमतीत बदलली जातात. दुसरीकडे, जर तुम्हाला तुमचे वाहन हायब्रीडमध्ये बदलायचे असेल, तर तुम्हाला ४५ किमीची रेंज आणि ६५kmph चा टॉप स्पीड मिळेल.
(हे ही वाचा : अर्ध्याहून अर्ध्या किंमतीत खरेदी करा ‘ही’ दमदार मायलेजवाली बाईक; जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर )
जर तुम्हाला बाईक इलेक्ट्रिकमध्ये बदलायची असेल, तर सुमारे २८,००० रुपये किमतीचे किट त्यात वापरले जाईल. ज्यामध्ये तुम्हाला २५ ते ३५ हजार रुपयांची बॅटरी दिली जाईल. तसेच तुम्हाला तुमच्या वाहनात ६०-६५ टॉप स्पीड आणि ५० ते १५० रेंज मिळेल.
किती येणार खर्च?
हायब्रीड मॉडेल २३,००० च्या बॅटरी आणि १६०००-२५००० रुपयांच्या किटसह येते. निर्मल इलेक्ट्रिक बद्दल बोलायचे झाले तर २२,००० रुपयांची किट आणि १६०००-४६००० रुपयांची बॅटरी दिली जाईल. त्यामध्ये, जर तुम्ही तुमची सायकल इलेक्ट्रिकमध्ये बदलली तर त्याची किंमत २५-३० हजार रुपयांपर्यंत आहे.