सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ समोर येत असतात, जे आपल्याला आश्चर्यचकीत करतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. नुकताच सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे जोडपे चित्रपटांची काॅपी करताना दिसत आहेत. हे जोडपे चक्क बाईकवर रोमान्स करताना दिसत आहेत. ही बजाज पल्सर 150 बाईक असून बजाज पल्सर ही बाईक भारतीयांची पसंतीची बाईक आहे. ही बाईक आपल्याला घराघरात दिसते. या बाईकवर अशाप्रकारचा स्टंट करणे जीवावरही बेतू शकतो. जो ट्राफीक नियमांचं उल्लंघन करत आहे. शिवाय हे कृत्य धोकादायक देखील आहे.
बजाज पल्सर 150 वर रंगला जोडप्यांचा रोमान्स
बजाज पल्सर 150 बाईकवर रोमान्स करत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण बजाज पल्सर 150 बाईक चालवत आहे आणि तरुणी चालत्या बाईकच्या टाकीवर त्याला मिठी मारून बसली आहे. त्यांची ही प्रवास करण्याची पद्धत फारच चुकीची होती. जे ट्राफिक नियमांचं उल्लंघन करत होतं.
(हे ही वाचा: Auto Expo 2023: लवकरच बदलणार तुमची कार चालवण्याची पद्धत ‘ही’ कंपनी देशात सादर तंत्रज्ञानाने सुसज्ज कार )
पाहा हा धोकादायक व्हिडिओ
दोघांच्या या रोमान्सचा व्हिडिओ हा मागून येणाऱ्या एका कारमधून हा व्हिडीओ काढला गेला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे आणि फुटेज पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले आहे. रेकॉर्डिंगमध्ये नंबरप्लेट स्पष्टपणे दिसत असल्याने, पोलिसांनी आरोपी तरुण जोडप्यावर कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम ३३६, २७९, १३२ आणि १२९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या जोडप्याच्या पालकांनाही बोलावून त्यांना याबाबत ताकीद दिली गेली आहे. ही घटना विशाखापट्टणममधील असल्याची माहिती आहे.