भारतात एकापाठोपाठ एक नवीन फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ईव्ही मार्केट झपाट्याने वाढत आहे. लोकांना अधिक रेंज आणि आधुनिक फिचर्ससह इलेक्ट्रिक स्कूटर आवडतात. दरम्यान, स्वदेशी कंपनी Crayon Motors ने नवीन Envy ई-स्कूटर सादर केली आहे. ज्याची किंमत फक्त ६४,००० रुपये आहे आणि कंपनीचा दावा आहे की, ती स्कुटर एका चार्जमध्ये १६० किमी धावेल.
Crayon ने ही नवीन Envy इलेक्ट्रिक स्कूटर व्हाईट, ब्लू, ब्लॅक आणि सिल्व्हर रंगात सादर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात १०० रिटेल ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच्या मोटर आणि कंट्रोलरवर २ वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. त्याच्या फिचर्सबद्दल बोलायचे तर, ते डिजिटल स्पीडोमीटर, जिओ टॅगिंग, कीलेस स्टार्ट, मोबाइल चार्जिंग आणि सेंट्रल लॉकिंग ऑफर करत आहे.
ही इलेक्ट्रिक स्कूटर 25KMPH च्या टॉप स्पीडसह 250W BLDC मोटर पॉवर देते. ते चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक नाही. हे अनेक भिन्न प्रकारांमध्ये सादर केले गेले आहे, जे एका चार्जमध्ये १६० Km ची रेंज देऊ शकते. मॉडेल फिचर्समध्ये ट्यूबलेस टायर्स, १५० मिमी ग्राउंड क्लीयरन्ससह डिस्क ब्रेक आणि कम्फर्ट राइट यांचा समावेश आहे.
आणखी वाचा : सेकंड हँड बाईक खरेदी करण्यापूर्वी या टिप्स एकदा नक्की वाचा, तुमची फसवणूक आणि त्रास वाचेल
क्रेयॉन मोटर्सच्या इन-हाउस रिसर्च आणि डेव्हलपमेंट टीमने त्याची रचना केली आहे. जे दिसण्याच्या बाबतीत नैसर्गिक सौंदर्याने प्रेरित आहे. यात ड्युअल हेडलाईट देण्यात आली आहे. हे ऑर्गेनिक पद्धतीने डिझाइन केले गेले आहे, जेणेकरून ते हलक्या गतीसह प्रवाशांना आरामदायी प्रवास देईल.
वाहन प्रदूषणापासून मुक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे कंपनीचे सह-संस्थापक सांगतात. ही एक भविष्यवादी प्रगतीशील आणि स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना फायनान्सच्या ऑप्शन्सची एक मोठी रेंज ऑफर करत आहे. ज्यामध्ये त्याने बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा, झेस्ट मनी, शॉपसे आणि पेटेल सारख्या अनेक फायनान्स कंपन्यांशी भागीदारी केली आहे.