कार क्षेत्राच्या MPV सेगमेंटला त्याच्या ७ सीटर कारसाठी प्राधान्य दिलं जातं, या कार मोठ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. मोठ्या कुटुंबासाठी सर्वात स्वस्त ७ सीटर घ्यायची असेल तर लोक Datsun GO Plus याला पसंती देतात.
Datsun GO Plus च्या D व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ४,२५,९२६ रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी ऑन-रोड असताना ४,७०, २४० रुपयांपर्यंत जाते, परंतु हीच ७ सीटर तुम्ही केवळ ४७ हजार रुपये भरून घरी घेऊन जाऊ शकता.
ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही कार खरेदी केली तर बँक यासाठी ४,२३,२४० रुपये कर्ज देईल. या कर्जानंतर, तुम्हाला किमान ४७ हजार रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला दरमहा ८,९५१ रुपये मासिक ईएमआय भरावा लागेल.
या Datsun GO Plus वर मिळालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ५ वर्षांचा कालावधी दिला आहे आणि बँक दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारेल. डाउन पेमेंट प्लॅन जाणून घेतल्यानंतर, जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, तर आता तुम्ही तिची फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
आणखी वाचा : नवी कार खरेदी करायचीय? City, Jazz आणि Amaze वर होंडाने आणली शानदार ऑफर
Datsun GO Plus मध्ये ११९८ cc इंजिन आहे जे ६७.०५ bhp पॉवर आणि १०४ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते आणि ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
कारच्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर, अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले कनेक्टिव्हिटीसह ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मॅन्युअल एसी, हीटर, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस आणि ईबीडी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही Datsun GO Plus कार १६.०२ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे.
(महत्त्वाची सूचना: Datsun GO Plus वर उपलब्ध असलेली कर्जाची रक्कम, डाउन पेमेंट आणि व्याजदर योजना तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून असते ज्याचा अहवाल नकारात्मक असल्यास, बँक त्यानुसार कर्जाची रक्कम, डाउन पेमेंट आणि व्याजदरांमध्ये बदल करू शकते.)