सध्या देशात सणासुदीचे दिवस सुरू आहेत. या निमित्ताने तुम्ही नवी कार घेण्याचा विचार करत असाल पण बजेटमुळे तुम्ही तुमचं हे स्वप्न पूर्ण करू शकत नसाल तर थोडं थांबा. कारण ही माहिती तुमच्या उपयोगाची ठरू शकते. स्वस्तातल्या कारमध्ये Datsun Redi Go या कारचं नाव घेतलं जातं. कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज देणारी कार सर्वात जास्त पसंत केली जाते.
Datsun Redi-GO च्या बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ३.९७ लाख रुपये आहे. ऑन रोड असताना ही किंमत ४.५१ लाख इतकी होते. जर तुमच्याकडे कार खरेदी करण्यासाठी ४ लाखांचे बजेट असेल, तर येथे जाणून घ्या सोप्या फायनान्स प्लॅनद्वारे ती खरेदी करण्याचा संपूर्ण फायनान्स प्लॅन…
फायनान्स प्लॅनद्वारे ही कार खरेदी करण्यासाठी, तुम्हाला फक्त ४५ हजार रुपये लागतील. कारण ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरच्या गणनेनुसार, बँक या कारसाठी वार्षिक ९.८ टक्के दराने ४,०६,०७० रुपये कर्ज देते. हे कर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला किमान ४५ हजार रूपयांचं डाउन पेमेंट करावं लागेल. पुढचे ५ वर्ष तुम्हाला प्रत्येक महिन्याला ८,५८८ रुपये मासिक EMI जमा करावे लागतील.
डॅटसन रेडी गो फायनान्स प्लॅनचे तपशील जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला या कारची फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि मायलेजचे संपूर्ण तपशील माहित असणे गरजेचे आहे.
आणखी वाचा : केवळ ८ हजार देऊन घरी घेऊन या Honda CD 110 Dream, EMI ८० रुपये दिवसाला
Datsun redi GO mileage
ही कार २०,७१ kmpl मायलेज देते, असा डॅटसनचा दावा आहे. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.
Datsun redi GO Engine and Transmission
Datsun redi GO मध्ये ७९९cc चे तीन सिलेंडर इंजिन दिले आहेत. हे इंजिन ५३.६४ बीएचपी पॉवर आणि ७२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन दोन्ही इंजिनासोबत देण्यात आला आहे. १.० लीटर इंजिनसोबत ५ स्पीड एएमटी हा पर्याय सुद्धा देण्यात आला आहे.
Datsun redi GO Features
या कारमध्ये एबीएस, ईबीडी, ड्रायव्हर साईड एअरबॅग, रियर डोर, चाईल्ड सेफ्टी लॉक, ड्रायव्हर पॅसेंजर सिट बेल्ट रिमाइंडर, ओव्हर स्पीड वॉर्निंग, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आणि रियरमध्ये पार्किंग सेन्सर्स या सारखे फीचर्स स्टँडर्ड म्हणजेच बेस व्हेरियंट देण्यात आले आहेत. टॉप व्हेरियंटमध्ये पॅसेंजर साईट एयरबॅग आणि प्रोजेक्शन गाईड सोबत रिव्हर्स पार्किंग कॅमेरा दिला आहे. कमी किंमती इतके मोठे आणि जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.