December Car sale: डिसेंबर महिना नवीन कार खरेदीसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो. गाड्यांचा स्टॉक क्लीअर करण्यासाठी कंपन्या अधिक सवलत देतात. एवढंच नाही, तर कार डीलर्स ग्राहकांना अतिरिक्त लाभही देतात. या वर्षीही डिसेंबरमध्ये कार कंपन्या त्यांचे स्टॉक क्लीअर करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मारुती सुझुकीपासून महिंद्रापर्यंत सर्व जण सवलत देण्यात आघाडीवर आहेत. जर तुम्ही या महिन्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या कोणत्या कारवर किती सवलत मिळणार आहे.
मारुती सुझुकी
या महिन्यात मारुती सुझुकी आपल्या कारवर खूप चांगली सवलत देत आहे. Alto K10 वर या महिन्यात ७२,१०० रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्याशिवाय S-Presso वर ७६,९५३ रुपयांपर्यंत आणि WagonR वर ७७,००० रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. कंपनी आपल्या लहान कार Celerio वर ८३,१० रुपये, जुन्या Swift वर Rs ३५,००० व नवीन Swift वर ७५,००० पर्यंत मोठी सवलत देत आहे.
या महिन्यात Brezza च्या खरेदीवर ५०,००० रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते आणि प्रीमियम कार Frontex वर ८८,१०० रुपयांपर्यंत, Jimny वर २.५० लाख रुपये, XL6 वर ३०,००० रुपये व Grand Vitara वर १.८० लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. सर्व कारवरील सवलत रोख, एक्स्चेंज, कॉर्पोरेट, ॲक्सेसरीज आणि विशेष सवलतींच्या अंतर्गत उपलब्ध असतील.
होंडा
डिसेंबर महिन्यात होंडा आपल्या कारवर चांगली सवलत देत आहे. कंपनी तिच्या सर्वांत लोकप्रिय SUV Elevate वर ९५,००० पर्यंत सवलत देत आहे. त्याशिवाय कॉम्पॅक्ट सेडान कार अमेझवर १.२६ लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. तसंच, जर तुम्ही या महिन्यात कंपनीची सेडान कार सिटी खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर तुम्हाला या कारवर १.०७ लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे.
ह्युंदाई
ह्युंदाईनेही त्यांच्या कारवर वर्षाच्या शेवटी सवलत देऊ केली आहे. या महिन्यात Grand i10 वर ५८,००० रुपयांपर्यंत, Exeter वर ४८,०००, Aura वर ३३,००० व i20 वर ५५,००० रुपयांपर्यंत सवलत उपलब्ध आहे. त्याशिवाय कॉम्पॅक्ट SUV व्हेन्यूवर ७६,००० रुपयांपर्यंत आणि Alcazar वर ८५,००० रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. तसेच कंपनी Ionic EV वर दोन लाख रुपयांपर्यंत सवलत देत आहे.
टाटा मोटर्स
या महिन्यात टाटा मोटर्सने त्यांच्या कारवर वर्षअखेरीस सवलत दिली आहे. तुम्ही छोटी कार Tiago खरेदी करणार असाल, तर त्यावर २५,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. त्याशिवाय Tigor वर ४५,००० रुपये, Punch वर १५,००० रुपये, Altroz वर ६५,००० रुपये व Nexon वर ३०,००० रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. एवढेच नाही, तर नवीन सफारी आणि हॅरियरवर २५,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे.
महिंद्रा
महिंद्राने या महिन्यात आपल्या वाहनांवर खूप चांगली सवलत दिली आहे. या महिन्यात तुम्ही Bolero वर १.२० लाख रुपये, scorpio वर ५०,००० रुपये व XUV700 वर ४०,००० रुपये वाचवू शकता. या सवलतीचा लाभ एक्स्चेंज, कॅश, कॉर्पोरेट, ॲक्सेसरीज व विशेष सवलतीच्या रूपाने मिळेल.