कारप्रेमी कायमच नव्या गाड्या आणि ऑफर्सच्या शोधात असतात. तुम्हीही नविन गाडी घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. भारतातील मोठी कार उत्पादक कंपनी ह्युंदईने यावर्षीचा जुना स्टॉक काढण्याची घोषणा केली आहे. जर तुम्हाला गाडी विकत घ्यायची असेल तर कंपनीची ऑफर बघा आणि गाडी खरेदी करा. ह्युंदई ही ऑफर लोकप्रिय कार i10 Nios, Santro, i20 आणि Hyundai Aura वर देत आहे.

Hyundai Aura

ह्युंदई ऑरोच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर ५० हजार रुपयांपर्यंतचे सूट मिळत आहेत. कॉम्पॅक्ट सेडान दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल मॉडेल १.२ लीटर आणि १.० लीटर टर्बो जीडीआय इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे, तर डिझेल प्रकारात १.२ लीटर सीआरडीआय इंजिन आहे. याशिवाय ह्युंदाई ऑरा ही सीएनजी पर्यायासह उपलब्ध आहे.

Grand i10 Nios

तुम्हाला ग्रँड आय 10 निओसच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर ५० हजार रुपयांपर्यंतचे फायदा मिळेल. ग्रँड आय 10 निओस १.२ लीटर आणि १.० लीटर टर्बो जीडीआय आणि डिझेल आवृत्तीमध्ये १.२ लीटर सीआरडीआय इंजिनसह ऑरासारख्या २ पेट्रोल इंजिन पर्यायांसह देखील येते. हे हॅचबॅक सीएनजी मॉडेलसह देखील येते.

Hyundai Santro

सँट्रो हे ह्युंदईचे एंट्री-लेव्हल मॉडेल आहे, ज्यावर तुम्हाला कंपनीकडून डिसेंबरमध्ये ४० हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. ह्युंदई सँट्रो १.१ लिटर एप्सिलोन एमपीआय पेट्रोल इंजिनसह पाच-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी दोन्ही पर्यायांमध्ये येते. याशिवाय, हे सीएनजी पर्यायासह देखील उपलब्ध आहे.

‘या’ निवडक गाड्यांवर Honda देत आहे आकर्षक सवलत, जाणून घ्या कोणती कार खरेदी केल्यास होणार फायदा

Hyundai i20

आय 20 ह्युंदईची प्रीमियम हॅचबॅच आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांवर ४० हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये १.२ लिटर आणि १.० लिटर टर्बो समाविष्ट आहे. तर डिझेल मॉडेल १.५ लिटर इंजिनसह येते.

Story img Loader